नाशिक, सिडको, - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नाशिक महानगरची बैठक इंदिरानगर येथील संताजी जगनाडे महाराज हॉल येथे संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक महानगराध्यक्ष सागर कर्पे तर प्रमुख पाहुणे म्हणून महासभेचे महासचिव डॉ. भूषण कर्डिले, कोषाध्यक्ष गजानन शेलार, विभागीय अध्यक्ष अॅड. शशिकांत व्यवहारे, प्रदेश सहसचिव जयेश बागडे उपस्थित होते.
समाजकार्य व समाजाचा लेखाजोखा मांडत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्य वाढवले पाहिजे असल्याचे डॉ. कर्डिले यांनी म्हटले तर पद व पदाचे महत्त्व समजून समाज संघटन वाढवून विविध व्यवसाय वाढीसाठी समाज बांधवांनी प्रयत्न करण्याचे मार्गदर्शन गजानन शेलार यांनी केले. समाज संघटन मजबूत करणे व समाज बांधवांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम करण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे आश्वासन सागर कर्पे यांनी दिले. यावेळी विविध आघाड्यांच्या नेमणुका करून त्यांचे नियुक्तीचे प्रमाणपत्र व महिलांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सचिव राजेंद्र लोखंडे, कार्याध्यक्ष जयेश आमले, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुनिता बोरसे, महानगराध्यक्ष योगिता दुर्गुले, व्यापारी जिल्हाध्यक्ष नंदू जाधव, महानगर उपाध्यक्ष राहुल गणोरे, अर्जुन वेताळ, विभाग अध्यक्ष नितीन पवार, प्रसाद व्यवहारे, राजेंद्र चौधरी, युवा आघाडी महानगराध्यक्ष अरुण क्षीरसागर, व्यापारी आघाडी अध्यक्ष निलेश खैरनार, सेवा आघाडी महानगराध्यक्ष विनायक सोनवणे, पुंडलिक चौधरी, सागर पाटील, दिनेश केदार तसेच सर्व युवा आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.