अरोली कोदामेंढी येथे संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महिला क्रांती आघाडी मौदा तालुका कार्याध्यक्षा कामिनी हटवार यांच्या माध्यमातून आपली भारतीय संस्कृती टिकविणे या उद्देशाने नववर्षाच्या उत्साह गुढीपाडवा निमित्त भव्य महिलांची स्कुटी रॅली काढण्यात आली.
कोदामेंढी ग्रामपंचायत येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष कामिनी हटवार तसेच मान्यवर कोदा मेंढीतील सरपंच आशिष बावनकुळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच विद्येचे ज्ञान देणारी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पदीप अर्पण करून रॅली काढण्यात आली. अरोली कोदामेंढी या दोन्ही गावातील महिलांनी एकत्रित येऊन भारतीय संस्कृतीचा मान राखून पातळ घालून फेटा बांधून हातात भगवा झेंडा घेऊन स्कुटी रॅली गुढीपाडव्याच्या जल्लोष दाखविला. प्रत्येक स्त्रीने आपली परंपरा जपायला पाहिजे आपली संस्कृती टिकवून ठेवायला पाहिजे या समाजकार्यातून कामिनी हटवार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजक संताजी ब्रिगेड तेली कार्याध्यक्ष कामिनी हटवार तर कार्यक्रमाला सहकार्य जिल्हा परिषद योग्य देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित ग्रामपंचायत सदस्य हेमाताई देवतळे, वैशालीताई निमकर, लताताई पानतावणे, मंदाताई बावनकुळे, प्रीती ताई शिवणकर, विद्याताई पानतावणे, कुसुमताई गांधी, रोशनी हटवार, माधुरीताई शिवणकर, अनिता बावनकुळे, सुरेखा भीवगडे, मीना दुबे, योगिनी आकरे, विना शिवणकर, वर्षा मानकर, प्रमिला भैसारे, माधुरी डोंगरे, विद्या निमकर, शिल्पा कुबडे, भारती कुबडे, बेबी नंदा गौनकर, नेहा निमकर, शिल्पा शिवनकर, मुक्ता कोटरूंगे, मोनिका चौपगार, शालू बावनकुळे, मंजू पात्रे, प्रीती पात्रे, पुष्पा पात्रे, सुषमा खोबरे ,पायल तरटे, माधुरी देवतळे, सुहाना शेख, रूपाली तरटे, सोनाली लिमजे,मंजू निनावे, शकुंतला हेडाऊ, हर्ष गाढवे, पूजा शेंडे, लक्ष्मी माकडे, नंदा निखारे, तन्वी लिमजे, बेबी पराते, भावना बावनकुळे, सोनाली लिमजे, प्रिया दबेटवार, रीना शेख, सुधा बावनकुळे, रुदा सावन, किरण देवतळे, वर्षा वाघमारे, कमल शेंडे, प्रियंका मोहर्ले, शिल्पा कावडे, आसाना सैयद जास्तीत जास्त महिलांचा सहभाग होता.