श्री गजानन नाना शेलार व श्री भूषण सर कर्डीले यांच्या मार्गदर्शनाने दि.२६.०३.२०२३ रविवार रोजी युवक आघाडी महानगर. नाशिक महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची बैठक श्री संताजी मंगल कार्यालय अशोकस्तंभ येथे युवक आघाडीचे महानगर अध्यक्ष श्री अरुण भाऊ क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेत पार पडली त्यावेळी श्री निलेश खैरनार व्यापारी आघाडी महानगराध्यक्ष, श्री सागर कर्पे प्रां. तै. महासभा महानगराध्यक्ष, श्री सुरेश पिंगळे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष यांनी सर्वांनी युवकांना भविष्यात आत्मनिर्भर होणे,शैक्षणिक समस्या, समाजातील गरजू युवकांपर्यंत जास्तीत जास्त लाभ कशाप्रकारे पोहोचवता येईल या साठी उपाययोजना तयार करणे तसेच सर्वांनी एकत्र राहून आपल्या समजाचे मजबूत संघटन निर्माण करणे गरजेचे आहे अशा विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.
यावेळी नाशिक विभागाचे श्री दीपक चौधरी सातपूर विभाग अध्यक्ष, श्री योगेश चौधरी उपाध्यक्ष, श्री शुभम नेरकर सिडको विभाग अध्यक्ष, श्री मोहित पन्हाळे उपाध्यक्ष, अभिजीत गवळी सहसचिव, श्री हर्षल गांगुर्डे खजिनदार,श्री वैभव कर्पे पंचवटी विभाग अध्यक्ष व सर्व युवा आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade