सासवड (ता. पुरंदर) - येथील धान्य बाजारपेठेतील महादेव मंदिर येथून कावडीने वाजतगाजत कऱ्हा स्नानासाठी प्रस्थान ठेवले. कावड कहे काठावरील संगमेश्वर महादेव मंदिर येथे आली. या ठिकाणी कावडीला भाविकभक्तांच्या वतीने कहा स्नान घालण्यात आले.
कावड ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात दर्शनासाठी गेली. तेथे नाथांचे पुजारी भैरवकर यांच्या वतीने कावडीचे पूजन व स्वागत करण्यात आले. त्यानंतर कावड सासवड शहरातील प्रमुख परिसरातून पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत मिरवणुकीने जाऊन आली. तसेच सोपाननगर वसाहत येथेही पालखीची प्रदक्षिणा झाली. त्यानंतर सायंकाळी आमदार संजय जगताप यांच्या निवासस्थानी जगताप कुटुंबीयांच्या वतीने स्वागत करण्यात आले. रात्री उशिरा कावड पुन्हा महादेव मंदिर येथे विसावली.
येत्या रामनवमीला शिखर शिंगणापूर येथे होणाऱ्या व दहा दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी अवघड अशा मुंगी घाटाचे चढण चढून कावड शिखर शिं- गणापूरला जाणार आहे. या ठिकाणी कऱ्हेच्या पाण्याची धार शिखर शिंगणापूर येथील महादेव मंदिर शिवलिंगावर घालण्यात येते. ही मानाची धार घालून झाल्यानंतर या यात्रेची सांगता होते, अशी तेल्या भुत्या कावडीचे प्रमुख कैलासबुवा कावडे यांनी दिली.