अकोला - 'समाज संघटित असणे गरजेचे आहे, संघटनशक्ती समाजासाठी वापरा,' असे आवाहन आमदार रामदास आंबटकर यांनी केले. राज्य तेली समाज समन्वय समितीचा वधू वर परिचय मेळावा शनिवारी प्रमिलाताई ओक हॉल येथे आयोजित केला होता. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी प्रमुख पाहुणे आमदार रामदास आंबटकर यांचा मानपत्र शाल व श्रीफळ देऊन गौरव केला. मेळाव्यात आयोजन समितीचे प्रा. प्रकाश डवले, प्रशांत शेवतकर, बालमुकुंद भिरड, डॉ पूजा धांडे, अॅड. किशोर लांजेवार, रमेशसेठ गोतमारे, गोपाल राऊत, ललितसेठ , भगत, अभय बिजवे मनोज साकरकार रामेश्वर वानखडे शशिकांत चोपडे, अनिल वानखडे, मेघा साठवणे, संजय वानखडे, योगेश गोतमारे, राजू भिरड, डॉ. नितीन बोराखडे, डॉ. आनंद पांडव, डॉ. पार्थ गवात्रे, विकास राठोड, नीलेश कपले हे उपस्थित होते.
गिरीधरपंत बोराखडे यांनी त्यांच्या कार्याचा परिचय दिला. प्रा प्रकाश डवले यांनी मेळाव्याचे महत्त्व विशद केले . बालमुकुंद भिरड यांनी समाज संघटित असणे गरजेचे आहे, असे सांगितले अॅड लांजेवार यांनी समाज संघटन वाढवणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या डिजिटलायझेशनची धुरा व संचालन प्रशांत शेवतकर यांनी केले. निवेदन अनिल वानखडे यांनी केले. आभार डॉ अभिजीत डवले यांनी मानले. संघटन ही एक शक्ती समाज संघटित असणे गरजेचे आहे, असे मत रामदास आंबटकर यांनी व्यक्त केले. त्यासाठी स्वतःचा मंच निर्माण करणे गरजेचे आहे.
संघटन ही एक शक्ती आहे. ती संघटितपणे निर्माण होऊन समाजकार्यासाठी वापरता आली पाहिजे, असेही ते म्हणाले. मेळाव्यामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला. सॉफ्टवेअरच्या मदतीने व आधुनिक तंत्राचा वापर करून विशाल स्क्रीनवर समाजातील मुला- मुलींचे बायोडाटा व फोटो दाखवण्यात आले. बायोडाटा स्वीकारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर झालेला होता. दिवसभर शिस्तबद्ध चाललेल्या या कार्यक्रमांमध्ये नाशिक पासून तुमसरपर्यंत असंख्य समाज बांधव उपस्थित होते.
पाच एप्रिल नंतर सर्व समाज बांधवांना डिजिटल पुस्तिकाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. असे आयोजन समितीतर्फे सांगण्यात आले. महिला आघाडीची लक्षणीय उपस्थिती होती. यात त्यामध्ये मृणाली डवले, ज्योती शेवतकर, शीतल गोतमारे, प्रियंका राठोड, दीपाली वानखडे, श्वेता तायडे, वैशाली निवाने, ज्योती खेडकर, नंदा झगडे, बलिंगे राधा पांडव यांची यांचा समावेश होता.