कामठी, ता. ३ : अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे राष्ट्रीय सरचिटणीस रामलाल गुप्ता यांनी श्री. संताजी नवयुवक मंडळ, महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सुभाष घाटे यांची अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे राष्ट्रीय संघटन सचिव तथा महाराष्ट्र व गोवा राज्याचे प्रभारी पदावर नामनिर्देशन केले आहे.
अखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्या राष्ट्रीय संघटन सचिव पदासाठी नामांकन झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना सुभाष घाटे म्हणाले की, अखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्या राष्ट्रीय संघटन सचिवपदासाठी माझी निवड झाली आहे. मी तैलिक महासभेचे कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांच्या विश्वासावर खरा उतरण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. माझ्या तरुण मित्रांनी जास्तीत जास्त संख्येने समाजाची सेवा करावी असा माझा सदैव प्रयत्न राहील. या नियुक्तीबद्दल ज्येष्ठ
समाजबांधव व तरुण सहकाऱ्यांनी आनंद व्यक्त करून अभिनंदन केले.
या नियुक्तीबद्दल श्री. संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र कार्याध्यक्ष तथा अखिल भारतीय तैलिक साहू महासभा युवा सेलचे उपाध्यक्ष मंगेश सातपुते यांनी नवनियुक्त राष्ट्रीय संघटन सचिव सुभाष घाटे यांचा वाठोडा, नागपूर येथील जयराम रेसिडेन्सी या निवासस्थानी सत्कार केला.
यावेळी नागपूर महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर सौ.मनिषाताई आशिष धावडे, माजी अध्यक्षा सौ.अभिरुचिताई अनिल राजगिरे, माजी अध्यक्षा सौ. समिता ताई राजेंद्र चकोले, माजी नगरसेविका सौ. वंदनाताई राजू भुरे, मंगेश सातपुते, प्रवीण बावनकुळे, प्रकाश कमळे, अनिल गुंजाळ, डॉ. रुपेश कमळे., गिरीश महाजन, विष्णू बोंद्रे, सीताराम साहू, दिलीप साहू, सुरेंद्र साहू, सोनू साहू, मनोज साहू, विष्णू साहू, रमेश आक्रे, भरत वंजारी, पत्रकार भास्कर भनारे, किरण रोकडे, सुभाष ढबाले, राजेश साखरकर, निखिल भुते, संजय फटिंग, कृष्णाजी सोनटक्के, बंटी घनमारे, रवी साहू, आकाश कैकाडे, दिनू साहू, रविप्रसाद मिश्रा, कुश शुक्ल गजानन तिरपुडे, सोमेश्वर वंजारी, शुभम वाड़ीभस्में, धर्मेंद्र सावरकर आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मंगेश सातपुते यांनी केले, तर रुपेश कमळे यांनी आभार मानले.