छत्रपती संभाजीनगर: विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तेली समाजातील महिलांचा नुकताच राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रारंभी, तेली समाजाचे दैवत संतश्री जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना सावे म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार हे महिलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने संवेदनशील असून, अनेक कल्याणकारी व विकासात्मक योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. तेली समाज हा स्वाभिमानी समाज म्हणन ओळखला जातो. या समाजाने मला वेळोवेळी साथ दिलेली असून, मी या समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. विभागीय अध्यक्ष नीलेश सोनवणे व विभागीय सचिव गणेश पवार यांचीही यावेळी भाषणे झाली. चंद्रकांत खैरे, अनिल मकरिये, कचरू वेळंजकर, भारत कसबेकर, रमेश क्षीरसागर, महेंद्र महाकाळ, विद्या करपे, लक्ष्मी महाकाळ, कपिल राऊत, रतन दळवे, राजू केदार, कृष्णा ठोंबरे, बद्रीनाथ लोखंडे, गणेश वाडेकर, भगवान गायकवाड, संतराम वाळके, भागिनाथ कर्डिले, जगदीश नांदरकर आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, श्रीराम कोरडे, लक्ष्मण राऊत, सुभाष वाळके, धोंडीबा वाळके, कृष्णा ढोंबळे, अनिल क्षीरसागर, नीलेश धारकर, संतोष गायकवाड, अर्चना फिरके, गायत्री चौधरी, रंजना बागुल, जयश्री वाघ, छाया सोनवणे आदींनी परिश्रम घेतले. आभार संजय आंबेकर यांनी मानले. लकी ड्रॉ स्पर्धेत सहभागी सहभागी होणाऱ्या एकूण ११ विजेत्या महिलांना पैठणी साडी देऊन गौरविण्यात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.