स्वातंत्र्यातील योद्धा संत जोगापरमानंद व आमचे नेभळटपण (भाग 6) - मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
स्वातंत्र्यात आज ही आपण कोन आहोत याची ओळख जेंव्हा होते तेंव्हा गुलामगीरीचा रस्ता सुरू होतो. हे वास्तव आहे. समाजा अंतर्गत संघटनेच्या नावा खाली जेव्हां विघटन करणारे एक केंद्र निर्माण होते तेव्हा समाजात वाद निर्माण होतो. समाजअंतर्गत मतात भेद निर्माण होऊन ज्यांना पारतंत्र्य लादावयाचे आहे त्यंना आपण आमंत्रणच देत आसतो. अशी सब कुछु वृत्ती नव्हे तर विकृती जेंव्हा प्रतिकृती म्हणुन समोर येते तेंव्हा चार शब्द मांडावे लागतात. समाजाच्या अंतर्गत प्रश्नाला भिडणारे निर्माण करण्यापेक्षा समाज बाहेरील शक्तींना भीडणारे बनवा आणी ही नेहमी प्रमाणे मी पुहा एक गुन्हा या निमित्ताने करीत आहे.