कोथरूड, दि. २७ - वधु-वर सूचक केंद्र काळाची गरज आहे. आपल्या आई-वडिलांच्या मतांना मोठे महत्त्व आहे, ते ही विचारात घ्यावे, असे मत संस्थेचे अध्यक्ष रमेश भोज यांनी व्यक्त केले. श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूडच्या वतीने तेली समाजाच्या वधुवर सुचक केंद्राचे उद्घाटन विवाह संस्थेचे जनक शामराव भगत आणि मनोहर डाके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तुरुंगाधिकारी तेजश्री चिंचकर यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मुळशीच्या माजी सभापती उज्वला पिंगळे, पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालिका निशा करपे, माजी नगरसेविका अश्विनी राऊत, अर्चना खोंड, विश्वस्त सुनंदा जाधव, दिलीप वावळ, संजय भगत, मिलिंद चव्हाण, रोहिदास हाडके, गणेश पिंगळे, संतोष माकुडे, गणेश देवराय, केंद्राचे अध्यक्ष सूर्यकांत मेढेकर, किरण किरवे आदी उपस्थित होते. प्रत्येक रविवारी संध्याकाळी चार ते सात या वेळेत समाज बांधवांसाठी हे केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहे. सुत्रसंचालन दिलीप शिंदे यांनी तर | प्रास्ताविक रत्नाकर दळवी यांनी केले. प्रा. शंकर पवार यांनी आभार मानले.