वधु-वर मेळावे हि खरोखरच काळाजी गरज आहे असे आपण मानतो, पण प्रत्यक्षात ते किती प्रभावीपणे होतात हे आपण पाहतच नाही. आपला समाज हा दोन कुटूबांचा व दोन वधु-वराचा विचार करून त्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतो. परंतु आजकाल त्या गोश्टीकडे कोणी समाजबांधव, पालक गांभीर्याने पहात नाही असे निदर्शनास येते. कारण राज्यातील जे वधु-वर मेळावे आपली मंडळे भरवत असतात त्यांना उपस्थिती चांगली असते, परंतु त्या मेळाव्यामध्ये फक्त पालकच असतात त्यांचे मूले किंवा मूली मेळाव्यास आलेली नसतात व आलेली असतील तरी त्यांचे नाव पुकारताच स्टेजवर जात नाही. मग हा एवढा खर्च, उठाठेव कशाकरीता करावयाची त्याकरीता मेळावे भरवा पण त्याला एवढे मोठे स्वरूप देऊ नका फक्त पुस्तिका छापा व त्याचे वितरण करा. म्हणजेच पालक परिचय मेळावा भरवावा व त्यामध्ये पुस्तक वाटप करावे. आताच मुंबई समाजाने एक वधु-वर मेळाव्याच्या दृश्टीकोनातून चांगला पायंडा पाडला आहे. त्याचे अनुकरण इतर शहरातील समाजाने करावे असे वाटते. एखादा मोठा हाॅल किंवा लाॅन घेतला व आमदार, खासदार आणि इतर याचेपैकी कोणाला बोलाविले म्हणजे मेळावा सरस, सुंदर झाला असे मानावे का हा प्रश्न पडतो व तशी समाजामध्ये चढाओढ निर्माण होते.
माझ्या मते मेळावे असावेत पण त्याचे स्वरूप मर्यादित असावे. विचारांची देवाण घेवाण होते. इतर समाज बांधवांशी ओळख होते, ओळखी वाढल्यामुळे समाजाला त्याचा एक प्रकारे फायदा होतो.
खालील माझे मुद्दे किती योग्य वाटतात ते पहावे.
1) प्रत्येक आयोजकाने ना नफा ना तोटा या धर्तीवर मोफत किंवा 100/- रूपये वाजवी किंमतीमध्ये पुस्तीका दयावी.
2) आजपर्यंत झालेल्या वधु-वर मेळाव्यात किती लग्ने ठरली व त्याचे प्रमाण किती टक्के आहे हे कोणी संागू शकेल का? झालेल्या मेळाव्यानंतर तशी आकडेवारी जमा होते का जी लग्न ठरतात ती पुस्तीकेमधून संपर्क करून ठरतात असे निदर्शनास येते. परंतु त्याचे प्रमाण फारच कमी असते.
3) आजपर्यंत झालेल्या वधु-वर मेळाव्याच्या पुस्तकात तीच मूले व त्याच मूली हयांचे फोटोसहित वर्णन असते. जर तेच फोटो पुन्हा पुन्हा पुस्तकामध्ये दिसले तर समाजामध्ये संभ्रम निर्माण होतो, कि त्याचे किंवा तीचे अजून लग्न का जमत नाही म्हणजे काही तरी प्राॅब्लेम आहे. त्यामुळे त्या फोटोकडे व वर्णनाकडे समाज कानाडोळा करतो. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच नवीन उमेदवार असतात. त्याकडे सूध्दा आयोजकांनी लक्ष द्यावे.
4) मेळावे भरवताना आयोजकांनी वधु-वराचे दोन पालक किंवा इतर दोन हयांना वधु किंवा वर असल्याशिवाय आतमध्ये प्रवेश देऊ नये असे वधु-वर मेळाव्याच्या फाॅर्ममध्ये सूचित करावे व बंधनकारक करावे तरच तो वधु-वर मेळावा ठरेल म्हणजे हया गोश्टीला आळा बसेल.
5) हया सततच्या मेळाव्यामुळे प्रत्येक वधु-वर पुढच्या मेळाव्यात यापेक्षा चांगले बघायला मिळेल हया अपेक्षेने असतात पुढे काय तर तेच तेच वधु-वर असतात. त्यामुळे मूला मूलींचे वय कधी 30-35 झाले हे त्या मूला-मूलींना व पालकांना कळत नाही? त्याचे कारण सतत होणारे मेळावे.
6) प्रत्येक आयोजकानी पुस्तकांचा खर्च जाहिरात व देणगीदार यांच्यातून करून समाजसेवा व समाज बांधिलकी हा उद्देश ठेवावा, जेवणाचा खर्च कमी करून चहा व नाश्ता ठेवण्यात यावा व एक ठराविक वेळेतच पुस्तकांचे वाटप करावे.
7) अलिकडे प्रत्येक पालक आपल्या मूला-मूलींना घरी ठेवून स्वतः दुसÚयाचे मुला-मुलींना पहाण्यासाठी मेळाव्यास येतात, प्रत्येकांनी असा विचार केल्याने मेळाव्यामध्ये 80 टक्के पालकच असतात म्हणून तो पालक मेळावाच होतो हयामध्ये बदल हवा आहे. सर्व आयोजकांनी एकत्र येवून चार महिन्याच्या अंतराने पालक मेळावे व पुस्तीका वाटप असावा असा कार्यक्रम करावा.
8) सुरूवातीला प्रमुख पाहुण्यांचे आगमन होते त्यातून चांगला संदेश जातो. चांगले विचार ऐकायला मिळतात. तोपर्यंत 2 वाजलेले असतात व नंतर वधु-वर मेळावा चालू होतो, तोपर्यंत खूप उशिर झालेला असतो.
9) किंवा प्रत्येक वधु-वर आयोजकांनी एकत्र येवून क्षेत्र सुंदुबरे येथे एकत्र वधु-वर पुस्तिका काढून ती सुंदूबरे येथे पुण्यतिथीदिनी प्रकाशित करावी त्यामुळे सुंदुबरे देवस्थानिची ओळख वाढेल व समाजाला समाधी दर्शन होईल.
10) काॅम्प्युटर युगामध्ये महाराश्ट्राची एकत्र वधु-वर वेब साईट स्वतंत्र साॅफ्टवेअर घेवून वधु-वराकडून योग्य ती फि घेऊन कोड नंबर देवून प्रत्येक वर्शी नुतनीकरण पध्दत ठेवावी. कोड नंबरशिवाय साईट ओपन करता येणार नाही अशी सोय असावी, त्यामुळे मेंबर वाढतील. जो मेंबर आहे त्यालाचा साईट ओपन करता येईल अशी सोय करावी.
11) आता खरी गरज आहे ती सामुदायिक विवाहाची हयाकडे सर्व आयोजकांनी लक्ष करावे.
12) हया मुद्दयांवरून वधुवर मेळावे आयोजकांनी बोध घेवून आपला मेळावा सुटसुटीत व कमी खर्चात कसा करता येईल याकडे लक्ष द्यावे ही विनंती.
वरील सर्व गोश्टींचा समाजबांधवांनी विचार करून आपली प्रतिक्रिया समाजाच्या मासिकामध्ये कळवावी हि विनंती.
श्री. प्रकाश वसंत जगनाडे (पनवेल)
(चिटणीस)
श्री संताजी महाराज जगनाडे
तेली संस्था सुुंदुबरे