धुळे, - तैलिक महासभेच्या महिला आघाडीतर्फे तेली समाजातील श्रमकरी, कष्टकरी, शिक्षक, डॉक्टर, नर्स, आशा वर्कर, पोलीस, आदि महिलांचा नारी शक्ती सन्मान व महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रांतिक तैलिक महासभा प्रदेश कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार तर प्रदेश महासचिव डॉ. भूषण कर्डिले यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी महापौर प्रतिभा चौधरी व विरोधी पक्षनेत्या कल्पना महाले, शिवसेना जिल्हाध्यक्ष सतिष महाले, गुजरात राज्य अध्यक्ष संजय लोटन चौधरी, सुनिता प्रभाकर चौधरी, जयश्री अहिरराव, उमविच्या सिनेट सदस्या दिपीका अनिल चौधरी, यांच्यासह मोठ्या पदावर नियुक्त मान्यवरांचा नागरी सत्कार करण्यात आला. व्यासपिठावर बेटी बचाव बेटी पढावच्या अध्यक्षा अल्फा अनुप अग्रवाल, स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, महिला व बालकल्याण सभापती सारिका अग्रवाल, मप्रातैम जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, भाजपा महिला आघाडी अध्यक्षा माया परदेशी, नगरसेविका लक्ष्मी बागुल, ज्योत्स्ना बबन थोरात, नगरसेविका वंदना थोरात, नगरसेविका मंगला चौधरी, छाया करनकाळ, वैशाली चौधरी, भारती अनिल अहिरराव, डॉ. निशा सुशिल महाजन, प्रभाकर चौधरी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष छाया करनकाळ यांनी केले. महिला मेळावाची सुरुवात संतश्रेष्ठ संत संताजी जगनाडे महाराज पुतळ्यास पुष्पहार व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करुन करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष गजानन शेलार, प्रदेश महासचिव डॉ. भूषण कर्डिले महापौर प्रतिभा चौधरी, विरोधी पक्षनेत्या कल्पना महाले, शिवसेना जिल्हाध्यक्ष सतिष महाले, गुजरात राज्य अध्यक्ष संजय चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. तैलिक महासभा धरणगांव तालुका अध्यक्षपदी भारती हेमंत चौधरी यांची निवड करण्यात येवून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. नारी शक्ती सन्मान सोहळ्यास जवळपास सुमारे ६८ तेली समाजातील श्रमकरी, कष्टकरी, शिक्षक, डॉक्टर, नर्स, आशा वर्कर, पोलीस, आदि महिलांचा नारी शक्ती सन्मान सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा आघाडीचे प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी धुळे जिल्हा अध्यक्ष छाया कल्याण करनकाळ, विभागीय कार्याध्यक्ष वैशाली नरेंद्र चौधरी, हेमलता अनिल चौधरी, मनिषा राजेंद्र चौधरी, शोभा किशोर थोरात, नलिनी रमेश करनकाळ, दिपाली तुषार चौधरी, मनिषा सजन चौधरी, सरोज विलास चौधरी, मिना चौधरी (साक्री ता. अध्यक्ष), अलका नटराज चौधरी, प्रियंका कल्पेश चौधरी, वर्षा गणेश चौधरी, उषा प्रकाश चौधरी (शिंदखेडा ता. अध्यक्ष), संजना कल्पेश चौधरी, आशा महेश चौधरी, अलका रघुनाथ चौधरी, रिटा प्रदिप बागुल, डॉ. योगीता योगेश चौधरी, शहादा शहराध्यक्ष, निरांजनी विनोद चौधरी, संगीता भागचंद्र चौधरी, तृप्ती कुणाल चौधरी, निशा सौरभ चौधरी, शोभा नेरकर, (शिरपूर तालुका अध्यक्ष) सरला बागुल, कल्पना सुभाष चौधरी, अर्पणा मनोहर चौधरी, विजया भटू चौधरी, सेजल सम्राट ठाकरे, सरला देविदास महाले, योगीता अनिल चौधरी, सुनिता प्रभाकर चौधरी, लता राजेंद्र करनकाळ, कल्याणी पंकज बागुल, प्रतिभा बापू चौधरी, कविता जितेंद्र चौधरी, कविता गोपाल चौधरी, संगीता जगदीश चौधरी, कविता कैलास चौधरी, रेखा भानुदास चौधरी शहादा उपाध्यक्ष, रत्ना चौधरी (शिरपूर शहर अध्यक्ष ) यांनी परीश्रम घेतले. सुत्रसंचलन शहर अध्यक्ष गणेश चौधरी, सचिव दिलीप सुर्यवंशी, सेवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश श्रीराम चौधरी यांनी केले.