धुळे - महिलांनी सक्षम बनून स्वसंरक्षणा बरोबरच समाजाच्या रक्षणासाठी पुढे यावे असे प्रतिपादन धुळे महापालिकेच्या महापौर सौ. प्रतिभाताई चौधरी यांनी केले ते खान्देश तेली समाज मंडळ आयोजित कराटे प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. साक्री रोड वरील कल्याण भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री एस. के. चौधरीसर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून कृ.उ.बा. अक्कलकुवाचे नवनिर्वाचित संचालक दिलीप शंकर चौधरी, चंद्रशेखर चौधरी नंदुरबार, जाधव साहेब नंदुरबार, हेमंत कुलकर्णी सर, सौ.नीताताई दिलीप चौधरी, ॲड.सौ. मंगलाताई चौधरी,मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, सचिव रवींद्र जयराम चौधरी, शहराध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी, प्रदेश तेली महासंघाचे शहराध्यक्ष लोकेश मोतीलाल चौधरी, महिला आघाडीच्या विभागीय अध्यक्ष सौ.मालती सुनील चौधरी, जिल्हाध्यक्षा सौ.कल्पना अशोक चौधरी, सचिव सौ.सविता प्रताप चौधरी, शहर अध्यक्ष सौ.भारती सोमनाथ चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले व दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अक्कलकुवा बाजार समितीच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल दिलीप शंकर चौधरी,प्रा.दीपक चौधरी सर, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ चॅम्पियन महेश संजय चौधरी, कराटेपटू साई विजय पगारे, मार्शल आर्ट पटू स्नेहा अतुल बागुल, कराटेपटू आश्लेषा जोशी या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांचा यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. सदरचे प्रशिक्षण शिबीर कल्याण भुवन,संतोषी माता मंदिर चौक, साक्री रोड, धुळे येथे रोज सायंकाळी सहा ते सात वाजे दरम्यान होईल. प्रशिक्षण विनामूल्य असून मुली व महिलांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नाही अशी माहिती मंडळाचे सचिव रवींद्र जयराम चौधरी यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली. सदरच्या शिबिरासाठी वाघाडी तेली समाजाचे अध्यक्ष श्री अशोक छगन चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून मनोगत व्यक्त करताना एस. के. चौधरीसर म्हणाले की, महिलांनी शिक्षणाबरोबर विविध प्रकारचे कला व क्रीडा शिक्षण घ्यावे व समाजसेवे साठी पुढे यावे. सत्कारमूर्ती दिलीप शंकर चौधरी यांनी मंडळाच्या वतीने महिलांसाठी राबवत असलेल्या उपक्रमाचे कौतुक करून महिलांसाठी उद्योग सुरू करून महिलांना उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहन द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. हेमंत कुलकर्णी सर व कु.आश्लेषा जोशी यांनी कराटे या खेळाविषयी संपूर्ण विस्तृत माहिती आपल्या मनोगतातून दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री चंद्रकांत श्रीराम चौधरी, किशोर पुंडलिक चौधरी, अतुल सुरेश वाघ, गजानन एकनाथ चौधरी, कमलेश कैलास चौधरी, मुकेश नवल चौधरी, सौ. भारती कैलास चौधरी,सौ. भारती भागवत चौधरी, श्रीमती लताताई संतोष चौधरी, सौ. रंजना मनोज चिलंदे, सौ. मनीषा संजय चौधरी, सौ. कल्याणी दीपक चौधरी,सौ.ज्योती अनिल नेरकर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.