नागपूर, ता. १५ : संताजी ब्रिगेड व जवाहर विद्यार्थी गृह यांच्या संयुक्त विद्यमाने ४ ते ११ मे दरम्यान ग्रीष्मकालिन संस्कार शिबिराचे करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन प्रा. अरुण रंधे आणि संगिता तलमले यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिरात पर्यावरण, अहिंसा, लाठीकाठी, कराटे, डान्स, चित्रकला, संगीत योगा, वेस्ट टू बेस्ट गणिताच्या सोप्या ट्रिक्स, कॉमन सेन्स अशा उपक्रमांचा समावेश होता. शिबिरात प्रा आदेश जैन, गौरव आळणे, पूजा कामडे, उन्नती व मानवी वैद्य, राजेश समर्थ, स्फूर्ती शेंद्रे, सहायक पोलिस निरीक्षक सुकेशनी लोखंडे, भावेश बावनकर, विनोद मानकर, अश्विनी वाघमारे यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा समारोप अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय पाटील, जवाहर विद्यार्थी गृहाचे अध्यक्ष रमेश गिरडे, दिलीप कामडे, डॉ अमुल धांडे यांच्या उपस्थितीत झाला. शिबिरासाठी प्रा. डॉ. दिपा भुरे (हटवार), संस्थापक सचिव, अजय धोपटे, मनिषा चकोले, विनोद येसखेदे, अजय कामडे व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कविता रेवतकर, रजनी वैरागडे, तसेच अनिल वानोडे, रुपेश तेलमासरे, चंदू वैद्य, प्रमोद कुलकर, सुनिल मानापुरे, राजेश हटवार, अतुल कावळे, विनोद मानापूरे, रश्मी वानोडे, प्रतिक बावनकर, मंगेश साखरकर व पालकांचे सहकार्य लाभले.