नागपूर : महाराष्ट्र राज्यातील नागपूर महानगरात अखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्या नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार व अखिल भारतीय तैलिक साहू महासभा, नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश वाघमारे होते.
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आशिष वांदिले, राष्ट्रीय संघटन सचिव सुभाष घाटे, राष्ट्रीय अध्यक्ष रोजगार सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष कुणाल पडोळे यांच्यासह डॉ. प्रा. रवींद्र येनुरकर, राज्यभाऊ माहुरे, नवनियुक्त पदाधिकारी राष्ट्रीय युवा कार्याध्यक्ष मंगेश सातपुते, राष्ट्रीय युवा उपाध्यक्ष प्रवीण बावनकुळे, राष्ट्रीय युवा कार्यकारिणी सदस्य डॉ. सीताराम साहू, सदस्य आकाश लांडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान उपस्थित समाज बांधवांना प्रवीण बावनकुळे, सुभाष घाटे, सुरेश वाघमारे यांनी संबोधित केले. विदर्भ पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष भास्कर भनारे, संदीप जिभकाटे, विष्णू बोंद्रे, सुभाष ढबाले, अक्षय हटवार, नरेंद्र हटवार, रमेश आकरे, संजय फटींग, गिरीश महाजन, मिलिंद चकोले, किरण रोकडे, सुभाष तडस, सुरेंद्र साहू, गजानन दांडेकर, नीलेश चांदेकर, श्रावण नागलकर, दिलीप साहू, ईश्वर गभणे, दिनेश गणगोवित, चंपालाल साहू, मंगेश सातपुते यांनी तर आभार अनिल गुजरकर यांनी मानले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade