मालेगाव डाबली येथिल प्राणघातक हल्ला केल्याबद्दल कारवाईसाठी डॉ. सुभाष भामरे व पालकमंत्री दादाभाऊ भुसे यांना निवेदन देण्यात आली. रितेश भाऊसाहेब निकम याने व त्याच्या साथीदारांनी रविद्र शंकर चौधरी यावर लाकडी दांड्याने प्राणघातक हल्ला केला. तलावावरील मुरुम कुठे वाहत आहे असे विचारले असता रितेश व त्याच्या साथीदारांनी रविद्रवर हल्ला चढवला. या प्राणघातक हल्ल्यामुळे रविद्र चौधरी गंभिरपणे जखमी झाला. यानंतर रविद्रच्या भाऊबंदास अपघात झाला आहे असे फोन करुन खोटे सांगितले. रविद्रवर मालेगाव सामान्य रुग्णालय, मातोश्री हॉस्पिटल व नंतर नाशिक येथे सह्याद्री हॉस्पिटल नाशिक येथे उपचार करण्यात आले.
रविद्र सह्याद्री हॉस्पिटल नाशिक येथे दाखल केले असता त्याची प्रकृती गंभिर होती व तो कोमात गेला होता. या सर्व प्रकरणाची रितसरपणे वडनेर पोलीस स्टेशन मध्ये नोंद केली आहे. सदर गुंड रितेश याचा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग होता असे कळते व डाबली गावात त्याची दहशत आहे व या घटनेमुळे ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत. त्यामुळे त्याचेवर कारवाई होणे गरजेचे आहे. या घटनेमुळे तेली समाजही प्रक्षुब्ध झाला आहे. या अमानवीय घटनेची आपण गंभिरपणे दखल घ्यावी ही विनंती व आपण यात गंभिरपणे लक्ष घालुन सदर आरोपीस जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावे असे निवेदनात म्हटले आहे . यावेळी रमेश उचित, दगा चौधरी, अशोक निकम पी.के. चौधरी, कमलाकर चौधरी, बाळु सौंदाणे, जिभाऊ ग्यानदेव करकाळ राजेश बडवणे अरुणाबाई चौधरी, रविद्र करंकाळ, पोपट बुधा चौधरी, अशोक बुधा चौधरी, मधुकर चौधरी, गोकुळ जाधव, मनोहर निम्बा चौधरी,, प्रविण चौधरी, आनंदा महाले, अशोक वेताळ, नामदेव वाघ, शिवाजी सोनवणे, माणिक निकम, किरण चंद्रकांत, अॅड. कृष्णा पवार बाळासाहेब चौधरी, सुदाम चौधरी,, भारत चौधरी, लालचंद बापु चौधरी, राजेंद्र सखाराम चौधरी, रमेश भिका, जनार्दन चौधरी, समाधान करंकाळ, नामदेव वाघ, विजय जगन्नाथचौधरी, हरिप्रसाद प्रकाश करंकाळ, एन. के, चौधरी सर, सुनिलचौधरी, रमेश रामचंद्र चौधरी, जिभाऊ ग्यानदेव करंकाळ, तुळशिराम वेताळ राजेंद्र किसन, मधुकर चौ. भरत करंकाळ, समाधान करंकाळ, रविद्र करंकाळ, पियुष करंकाळ, आत्माराम आनंदा अहिरे न्हावी इ. उपस्थित होते.