गोंदिया - भारतात दिवसेंदिवस बदलत चाललेल्या राजकीय सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा विपरीत परिणाम भारतातील प्रत्येक नागरीकावर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. भारत लोकसंख्येच्या दृष्टीने जगात प्रथम क्रमांकाचा देश असून भारतात अनेक तरुण बेरोजगारीच्या खाईत लोटत आहे. दारिद्र्य, बेरोजगारी, अंधश्रद्धा, धर्मवाद, भाषावाद, जातीयवाद प्रांतवाद सरकारी विभागाचे खाजगीकरण शेतकर्याच्या शेतमालाला योग्य भाव न मिळणे यासारख्या समस्या निर्माण झाली आहे. सध्या बदलत्या भारताच्या आणि महाराष्ट्राचे एकूण परिस्थिती बघितलं असता वेगळ्या पध्दतीने राजकारण सुरू आहे. असे जाणवते. मोठ्या संख्यने असणाऱ्या ओबीसी समाजावर त्यांच्या परिणाम होत आहे. त्याबद्दल समाजात जनजागृती करण्यासाठी व संविधानिक हक्क लढ्यासाठी काढण्यात आलेल्या विदर्भ तेली समाज महासंघाच्या संवाद यात्रेचे गोंदियात मंगळवारला आगमन झाले होते. या यात्रेतील मान्यवरांनी समाजाल संविधानिक हक्क अधिकाराची माहिती देत लढ्यातील मंडल यात्रेत व समारोपीय कार्यक्रमात सहभागी
होण्याचे आवाहन केले.
यावेळी वेगळा विदर्भ राज्य, ओबीसींची जातनिहाय जनगणना, मंडल आयोगाच्या शिफारशींची अमलबजावणी करणे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे आदीसह ओबीसींच्या महाज्योती संस्थेची माहिती देण्यात आली. या संवाद यात्रेत नेतृत्व विदर्भ तेली समाज महासंघाचे अध्यक्ष रघुनाथ शेन्डे, सरचिटणीस डॉ. प्रा नामदेव हटवार, संघटक प्रा. रमेश पिसे, विलास काळे, उमेश कोरराम, युवा आघाडी अध्यक्ष शेषराव गिरपुंजे, सहसंघटक कृष्णा बेले, सहसचिव संजय सोनटक्के, सुधीर सुर्वे, मीरा मदनकर, संजय भलमे, पुरुषोत्तम कामडी, राजेंद्र डकरे, सुधाकर मेश्राम, अनिल कुमार, नागेश्वर हटवार, शंकर ढबाले, प्रकाश भुरे, रविंद्र मनापुरे, आनंदराव कृपाने, नारायण बावनकर, राजेश चांदेवार, अँड पुष्पकुमार गंगबोईर आदी करीत आहेत. गोंदियातील संताजी मंगल कार्यालयात झालेल्या संवाद यात्रा मार्गदर्शन कार्यक्रमाला कैलास भेलावे, शेषराव गिर्हेपुंजे, संजय सोनटक्के, सुचिता बडवाईक, रविता वैद्य, सुनंदा बावनकर, मिनाक्षी बावनकर, कल्पना धुर्वे, नंदा डोरले, इंदुताई राजुरकर, क्रिष्णा चव्हाण, मिना सुर्यवंशी, भाष्कर राजगिरे, रामभाऊ वंजारी, ममता गिर्हेपुंजे, शंकर चामट, विजय मानापूरे, अतुल वैद्य, शिवशकंर बावनकर, संजय बावनकर, राजेश चांदेवार, बबलू गभणे, नविन बावनकर, गंगाराम कापसे, प्रमोद खोब्रागडे, विकास कारंजेकर, नम्रता बल्ले, दिनेश बल्ले, महेश कावळे, राजेश वैद्य, गणेश बरडे, शेषराव गिर्हेपुंजे, पुरुषोत्तम गिर्हेपुंजे, हर्षा न्यायकरे आदी मोठ्या संख्येने समाजबंधुभगिणी उपस्थित होत्या.