अकोला श्री राठोड तेली. समाजाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा श्री भिरड मंगल कार्यालय येथे २ जुलै रोजी श्री संत संताजी जगनाडे महाराजांचे पूजन व दीपप्रज्वलनानी सुरु करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प. अध्यक्ष बालमुकद भिरड, उद्घाटक रा.स्व. संघाचे माणिकराव नालट, प्रमुख अतिथी उमेश सापधारे, मुख्य मार्गदर्शक आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त राजेश पातळे होते, तर व्यासपीठावर तेली समाजाचे अध्यक्ष दिलीप नायसे, देविदास भिरड, रमेश गोतमारे, बोरे गुरुजी, देवाशिष काकड, गजानन बोराळे, राजेश मधुकरराव वानखडे, महिला आघाडी अध्यक्षा पुष्पा वानखडे, अनिता भिरड यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविकमध्ये राठोड तेली समाज सचिव गजानन बोराळे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व गुणगौरव सत्कार घेण्याची भूमिका मांडली तसेच समाजाच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
प्रमुख अतिथी सापधारे यांनी विद्यार्थी जीवनात कधीही खचून न जाता नव्या आव्हानांचा सामना करून प्रगती करावी, असे मत मांडले, तर अध्यक्षीय भाषणात बालमुकुंद भिरड यांनी विद्यार्थ्यांनी मोबाइलचा वापर चांगल्या अभ्यासाकरिता व नवीन तंत्रज्ञान शिकण्याकरिता करावा, असे संबोधित केले. तेली समाजाच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त राजेश पातळे यांना विशेष सत्काररूपी समाजभूषण या पदवीने सन्मानित करण्यात आले तसेच तेली समाजाच्या वतीने ८० विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्हासह सत्कार करण्यात आला. यामध्ये अथर्व मनसुटे, आस्था झापर्डे, क्षितिजा चोपडे, गौरी इचे, संस्कृती आसटकर, मयुरी ढवळे, रुद्र पांडव, अविष्कार देठे, श्रावणी कपिले, प्रणाली उमाळे, देवश्री मेहरे, तनिष्क रोठे यासह विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याप्रसंगी माजी नगरसेवक तुषार भिरड, रेखा नालट, कल्पना अडचुले, अश्विनी मेहरे, रश्मी चोपडे, कांचन वानखडे, ज्योती रायपुरे, भाग्यश्री ढवळे, वसंत सोनटक्के, प्रकाश झापर्डे, नीलेश मालगे, प्रशांत चोपडे, नीलेश खांदेल, राजू सोनटक्के, ज्ञानेश्वर रायपुरे, विनोद नालट, खरपकार, विलास मेहरे, डॉ. भुजबुले, राजू मिरड, गजेंद्र ढवळे, सागर नायसे, शेषराव सांग यासह समाजबांधवांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाला अल्पोपाहाराची व्यवस्था स्व. नामदेवराव आकोटकार गुरुजी यांचे स्मृतीत आकोटकार परिवारानी केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तन-मन-धनानी माजी नगरसेवक नितीन झापर्डे, माजी नगरसेवक तुषार भिरड, संजय आकोटकार यांचे सहकार्य लाभले. अनिल वानखडे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार पुष्पा वानखडे यांनी मानले.