गडचिरोली : संताजी सोशल मंडळ गडचिरोलीच्या वतीने इयत्ता दहावीत ८० टक्के व बारावीत ७५ टक्के त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी तसेच एमपीएससी, यूपीएससी व पीएचडी, एमबीबीएस, नवोदय, स्कॉलरशिप उत्तीर्ण झालेल्यांचा सत्कार कार्यक्रम रविवार ९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी अध्यक्षस्थानी संताजी सोशल मंडळाचे अध्यक्ष प्रा. देवानंद कामडी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थी तेली समाज महासंघ नागपूरचे विद्यार्थी युवा नेते उमेश कोराम, प्रमुख अतिथी म्हणून दै. पुण्य नगरी' चे जिल्हा प्रतिनिधी अविनाश भांडेकर, संताजी सोशल मंडळाचे सचिव गोपीनाथ चांदेवार आदी उपस्थित राहणार आहेत. समाजातील गुणवंत विद्यार्थी, पालकांनी तसेच समाजबांधवांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन संताजी सोशल मंडळाचे अध्यक्ष प्रा. देवानंद कामडी, सचिव गोपीनाथ चांदेवार, उपाध्यक्ष अफॅड. रामदास कुनघाडकर, सहसचिव अनिल बालपांडे, कोषाध्यक्ष राजेश इटनकर, कार्याध्यक्ष रामराज करकाडे, सदस्य प्रभाकर वासेकर, प्रमोद पिपरे, सुरेश भांडेकर, विठ्ठल कोठारे आदींनी केले आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade