यवतमाळ. नुकताच इयत्ता १० वी १२ विचा निकाल लागला असता विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा यवतमाळ व संताजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यवतमाळचे वतीने दिनांक २९ जुलै शनिवारी दुपारी १२ वाजता भावे मंगल कार्यालय पुनम चौक पोस्टल ग्राउंड जवळ यवतमाळ येथे तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा श्री संताजी जगनाडे महाराज चारीटेबल ट्रस्ट रजी. नं. ई २४१ द्वारा आयोजित समाजातील गुणवंत होतकरू अत्यंत गरीब विद्यार्थ्यांला ५०००रू शिष्यवृत्ती देण्याचा संकल्प करण्यात आला आहे
समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करण्याकरिता नितेश कराळे वर्धा व महाज्योती विषयी विस्तृत माहिती करिता उमेश कोराम स्टुडन्ट फेडरेशन नवी दिल्ली हे माहिती देण्याकरिता निमंत्रित करण्यात येणार आहे. तेव्हा ज्यांना दहावीला व १२वी ला ८०% गुण प्राप्त झाले असेल त्यांनी संताजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यवतमाळ नेहरू चौक गोकुल खादी भंडार जवळ व श्री संताजी जगनाडे महाराज स्ट्रस्ट् शिष्यवृत्तीचे फॉर्म उपलब्ध असेल, प्रत्येक १६ तालुक्यातील समाजातील अत्यंत गरीब व होतकरू २ विद्यार्थ्यांला शिष्यवृत्ती देण्याचा आमचा संकल्प आहे. तेव्हा फ्रॉमची १०० रू सहयोग राशी म्हणून फी आकारण्यात आली आहे. तेव्हा आपल्या १०वी व १२वी च्या गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत संताजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नेहरू चौक गोकुल खादी भंडार जवळ यवतमाळ येथे आणून देण्यात यावी असे आव्हान प्रा. धनंजय आंबटकर, विलास काळे, अजय किन्हीकर, किशोर थोटे किशोर पाटील, सुनील महिंद्रे, सुरेश वडतकर, किशोर सुरकर, भास्करराव देशमुख, नरेंद्र रामेकर विशाल ठोबरे, संदीप गुल्हाने, रवी चरडे, ज्ञानेश्वर एन. रायमल, अध्यक्ष संताजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यवतमाळ चे वतीने करण्यात येत आहे.