मराठा समाजाचे स्वतंत्र आरक्षणास आमचा विरोध नसतानाही, त्याचे आंदोलकांनी आपल्या तेली समाजाचे अखिल भारतीय तैलिक शाहु सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री मा. श्री. जयदत्त अण्णा क्षिरसागर व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, युवक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष आमदार मा. श्री. संदिपजी क्षिरसागर यांच्या कार्यालयाची तोडफोड करुन, त्यांचे घर पेटविण्यात आले तसेच त्यांच्या चारचाकी गाड्यांची सुध्दा तोडफोड करून जीवघेणा हल्ला करण्यात आला. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे राज्य अध्यक्ष मा. खासदार श्री रामदासजी तडस, महासचिव डॉ. भूषण कर्डिले, कोषाध्यक्ष श्री गजानन शेलार यांचे आदेशान्वये व राज्य सहसचिव श्री बळवंत मोरघडे यांचे नेतृत्वात दि.1/11/2023 ला.दू 3 वा डॉ विपीन इटनकर, जिल्हाधिकारी, नागपूर यांना,त्यांचे मार्फत या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करन्यासाठी महाराष्ट्राचे मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री यांना ऐक निवेदन देण्यात आले.
या निवेदनातून दोषींवर ताबडतोब अटक कारवाई करून,त्यांना कलम 302 अन्वये कठोर कारवाई करावी.अन्यथा आम्हाला आमचे आरक्षण व स्वरक्षणासाठी जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरावे लागेल, यास शासन जबाबदार राहील. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.या प्रसंगी नागपूर शहरातील महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा चे पदाधिकारी सर्वश्री प्रा. कुणाल पडोळे, प्रा. राजेंद्र झाडे, सौ मंगलाताई मस्के, राजेश बारुटकर, सौ. जयश्री गभने, किशोर वर्भे, देवेंद्र काळबांडे, रमेश उमाटे, निखिल भुते, प्रमोद क्षिरसागर, वैभव गोल्हर, रुपेश कुबडे, पीयूष आकरे, उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade