महाराष्ट्राच्या समाजाच्या विकासाचा ठेका घेतलेली संघटना व या संघटनेचे हाय कमांड ते पदाधिकारी एका तालात एका सुरात नेहमी एकच गाणे वाजवतात. आम्ही बारा टक्के आहोत. आम्ही तुमचे बारा वाजवु शकतो. या गाण्यातील हे जे कडवे आहे. ते मात्र सत्य आहे. कारण या कडव्यात खरी ताकद आहे. पण जसे हे गाणे लांबत जाते तसे समाजाचा शेवटचा बांधव त्याच गाळात अधीक रुतु लागतो. तेंव्हा उरते फक्त कडवे आणी याचा गाभा हवेत विरला जातो.