अखिल तेली समाज सांस्कृतिक सेवा संस्था नागपुर च्या वतीने जिल्हाधिकारी यांना समाजाच्या वरिष्ठ नेत्यांच्या घरावर, कुटुंबियांवर व कार्यालयावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ निवेदन दिले. मा. डॉ.विपीन इटणकर, जिल्हा अधिकारी नागपूर मार्फत मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले
आरक्षण संदर्भात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण चालू असताना मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागून तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी कॅबिनेट मंत्री श्री जयदत्त क्षीरसागर तथा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष मा. आमदार संदीपभैया क्षिरसागर यांचे निवास्थान, संपर्क कार्यालय व गाड्या तसेच ओबीसी समाजाचे आमदार प्रशांत बंब, आमदार प्रकाशजी सोळंके अशा ओबीसी समाजाच्या नेत्यांना टार्गेट करून त्यांच्या कार्यालयाची, मालमत्तेचीं तोडफोड करुन व आग लावुन जाळपोळ केल्याच्या निषेधार्थ अखिल तेली समाज संस्थेने, विध्वंसक वृत्तीच्या कार्याची दखल घेऊन हे कृत्य करणाऱ्यांवर कठोर पावले ऊचलुन कडक कारवाही करण्यात यावी असे निवेदन मा. श्री रमेशजी बैस साहेब राज्यपाल महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना मा. ईटनकर साहेब जिल्हा अधिकारी नागपूर यांच्या माध्यमातून देण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक ,सचिव अरूणराव धांडे, कार्यकारिणी सदस्य मंगलाताई मस्के, गिताताई महाकाळकर, कन्हान चे अध्यक्ष सुर्यभानजी चकोले, पुर्व नागपूर चे अध्यक्ष धिरजजी काटे, नागपूर शहर संपर्क प्रमुख श्रीकांत क्षीरसागर व इतर सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.