नागपूर : सर्व जाती धर्मातील विवाहोत्सुक विधवा - विधूर घटस्फोटीत, अंध अपंग, मुक- बधीर, पांढरे डांग व प्रौढांचा विवाह होण्यासाठी. मानवी जिवनांचा आनंद घेण्यासाठी विशेषतः विधवा-विधुर व घटस्फोटीतांच्या पुनर्विवाहास समाज मान्यता मिळवून देण्याच्या उद्देशाने विदर्भ तेली समाज महासंघ व महात्मा शंभुक, संताजी, डॉ. मेघनाद साहा प्रबोधन मंच नागपूर च्या वतीने परिचय मेळाव्याचे आयोजन सेवादल महिला महाविद्यालय, सक्करदरा चौक, उमरेड रोड, नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अनेक जिल्ह्यातून विविध भागातून युवक, युवती सहभागी झाले होते. विवाहोत्सुक युवक- युवती आणी प्रौढांसाठी परिचयाचे
पुस्तिकेचे प्रकाशन "आधार-६" स्मरणीकेचे उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. संजय शेंडे कार्याध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंघ तर कार्यक्रमाचे उद्घाटन शास्त्रज्ञ डॉ. प्रा. संजय ढोबळे भौतिकशास्त्र विभाग रातुम नागपूर विद्यापीठ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलताना शास्त्रज्ञ प्रा. डॉ. ढोबळे यांनी सांगितले की विवाह त्यांच्या कुटुंबाचाच प्रश्न नसून हा मानवी समाजाचा प्रश्न आहे. असे मत व्यक्त केले. त्यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख मागर्दशक म्हणून बोलताना प्रा. विजयाताई मारोतकर कवियत्री व लेखिका यांनी सांगितले की "मोबाईल फोनच्या अति वापरामुळे घटस्फोटाच्या प्रमाणात वाढ झाल्याचे मत व्यक्त केले. मा. नितीन कुंभलकर सामाजिक कार्यकर्ते, मा. शेखर गुल्हाने सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी, विशेष अतिथी म्हणून मा. रघुनाथ शेंडे अध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंघ, प्रा. डॉ. नामदेवराव हटवार सरचिटणीस, अँड. प्रा. रमेश पिसे संघटक, मा. कृष्णाजी बेले सहसंघटक, विलास काळे संघटक, ज्ञानेश्वर रायमल संघटक, यवतमाळ, केशवराव शेन्डे, मायाताई वाघमारे, जानकीताई सेलोकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.सुरेश वंजारी अध्यक्ष नागपूर शहर प्रास्ताविक प्रा. डॉ. नामदेवराव हटवार तर आभार प्रदर्शन संजय सोनटक्के सचिव यांनी केले. वधु वराचे परिचय शंकर ढबाले यांनी करुन दिले. मेळाव्याच्या कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता उपस्थित धनराज तळवेकर, प्रेमानंद हटवार, राजेंद्र डकरे, रमेश उमाटे, मिरा मदनकर, वंदना वनकर, शुभांगी घाटोळे, अनिल घुसे, पुरषोत्तम कामडी, सुभाष कळंबे, प्रशांत मदनकर, माणिकराव सालनकर, दिपक खोडे, डॉ. विलास तळवेकर, आनंद नासरे, राम कावडकर, राजूभाऊ तळवेकर, कमलाकर राजूरकर, संजय भलमे आणी इतर तेली समाज बांधवांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मोलाचे योगदान लाभले.