शिरपूर । अखिल भारतीय तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष, ओबीसी नेते, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री जयदत्त क्षिरसागर यांच्या घरावर, कार्यालयावर व कुटुंबावर हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक करून कार्यवाही करावी अन्यथा संपूर्ण राज्यात प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तिव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा प्रदेश तेली महासंघ युवा प्रदेश कार्याध्यक्ष शामकांत ईशी व पदाधिकारी यांनी तहसिलदार यांना निवेदनाद्वारे दिला.
या घटनेच्या निषेधार्थ प्रदेश तेली महासंघ युवक आघाडी शिरपूरतर्फे तहसीलदार महेंद्र माळी यांना निवेदन देण्यात आले यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अखिल भारतीय तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ओबीसी नेते व राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या बीड येथील घरावर व परिवारावर भ्याड हल्ला झाला. त्यांचे घर ऑफीसची जाळपोळ करण्यात आली. त्यांच्या परिवारावर जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न झाला. अश्या गुंड प्रवृतीच्या लोकांचा महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. अशा समाजकंटकांना ताबडतोब शोधून कठोर कार्यवाही करुन न्याय मिळवुन द्यावा. कडक कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा प्रदेश कार्याध्यक्ष शामकांत ईशी व पदाधिकारी यांनी दिला.
निवेदन देतेवेळी प्रदेश तेली महासंघाचे पदाधिकारी प्रदेश तेली महासंघ सेवा आघाडी तालुकाध्य क्षरमेश चौधरी, युवक आघाडी जिल्हा सचिव नरेश चौधरी, जितेंद्र सोनवणे, भाजपा तालुका चिटणीस सुनिल चौधरी ( कुवे), न प शिक्षण मंडळ प्रमुख मोहन चौधरी, शिक्षण मंडळ सदस्य सुरेश चौधरी, खान्देश तेली समाज शहराध्यक्ष नरेंद्र चौधरी, दिनेश चौधरी, अरुण चौधरी, शिरीष चौधरी, ईश्वर चौधरी, विजय मोहन चौधरी, धनंजय चौधरी, दगडू चौधरी ( भाटपुरा ), ज्ञानेश्वर चौधरी, तेली समाज पंच मंडळ सदस्य सुरेंद्र चौधरी, विजय हिरामण चौधरी, आकाश चौधरी, लालचंद पिंटू चौधरी, सोहन चौधरी, प्रतिक ईशी, चंद्रकांत शरद चौधरी, यश चौधरी, गोविंद चौधरी, विठोबा चौधरी ( वाघाडी), मयुर ऐशी, किरण चौधरी, लंकेश गांगुर्डे, सुनिल काशिनाथ चौधरी, नाना संतोष चौधरी, सचिन चौधरी, प्रकाश चौधरी, राकेश चौधरी, हर्षल चौधरी, वेदांत चौधरी, दिपक चौधरी यांचेसह समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.