नागपूर : विदर्भ तेली समाज महासंघ व डॉ. मेघनाद साहा प्रबोधन मंचच्या वतीने परिचय मेळावा व पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन सेवादल महिला महाविद्यालय, सक्करदरा चौक, उमरेड रोड येथे करण्यात आले. डॉ. नामदेव हटवार यांच्या डॉ. मेघनाद साहा यांच्यावरील पुस्तकाचे व 'आधार- ६' या परिचय पुस्तिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी विदर्भ तेली समाज महासंघाचे कार्याध्यक्ष संजय शेंडे होते. मेळाव्याचे उद्घाटन डॉ. प्रा. संजय ढोबळे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखिका प्रा. डॉ. विजया मारोतकर, सामाजिक कार्यकर्ते नितीन कुंभलकर, सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी शेखर गुल्हाने, विदर्भ तेली समाज महासंघाचे अध्यक्ष रघुनाथ शेंडे, सरचिटणीस प्रा. डॉ. नामदेवराव हटवार, संघटक अॅड. प्रा. रमेश पिसे, सहसंघटक कृष्णा बेले, संघटक विलास काळे, संघटक ज्ञानेश्वर रायमल, डॉ. केशवराव शेंडे, महिला आघाडीच्या अध्यक्ष जानकी सेलूकर प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन शहराध्यक्ष सुरेश वंजारी यांनी तर आभार सचिव संजय सोनटक्के यांनी मानले. मेळाव्यासाठी धनराज तळवेकर, सुरेश वंजारी, प्रेमानंद हटवार, राजेंद्र डकरे, रमेश उमाठे, मिरा मदनकर, वंदना वनकर, शुभांगी घाटोळे, माया वाघमारे, अनिल घुसे, पुरषोत्तम कामडी, सुभाष कळंबे, प्रशांत मदनकर, माणिकराव सालनकर, दीपक खोडे, डॉ. विलास तळवेकर, आनंद नासरे, राम कावडकर, राजूभाऊ तळवेकर, कमलाकर राजुरकर संजय भलमे आणि समाज बांधवांनी परिश्रम घेतले