गडचिरोली - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक समाजाचे राष्ट्रिय अध्यक्ष तथा माजी कॅबिनेट मंत्री जयरत्न क्षिरसागार व युवा आघाडी अध्यक्ष आ. संदिप क्षिरसागर यांचे निवासस्थान, गाड्या व कार्यालय तसेच आ. प्रकाश सोळंके व प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड व आग लावणाऱ्यांचा निषेध करुन त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रांतिक महासभेतर्फे तैलिक जिल्हाधिकारी यांच्यातर्फे राज्यपालांना निवेदन देण्यात आले.
मराठा आंदोलक आरक्षणासाठी जाळपोळ करीत आहेत. आंदोलकांनी तेली समाजाचे राष्ट्रीय नेते जयदत्त क्षिरसागर, आ. संदिप क्षिरसागर यांच्या बीड येथील निवासस्थानी पाच सहा गाड्या व कार्यालयाला आग लावून भस्मात केले. व घरातील सर्वांना जिवंत जाळण्याचे षडयंत्र केले आहे. तसेच आ. प्रकाश सोळके, प्रशांत बंब, कुंडलीक खाडे यांच्यासह अनेक अल्पसंख्यांक व मागासवर्गीय समाजाला देखिल मराठा समाजाच्या आंदोलकांनी वेठीस धरुन जाळपोळ केलेले हे कृत्य घृणास्पद व निंदनिय आहे.
मराठा समाजाला सर्व ओबीसी समाज, अल्पसंख्यांक व मागासवर्गाने पाठिंबा दर्शविलेला आहे. ज्या कोणी आंदोलकांनी ओबीसी समाज बांधवांची व अल्पसंख्यांकांची घरे, गाड्या व कार्यालये जाळली त्यांना ताबडतोब अटक करुन त्यांच्यावर कलम ३०२ अन्वये कठोर कार्यवाही करावी. झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने द्यावी. मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी दुमत नाही. ओबीसीच्या आरक्षणामधून देवू परंतू नये. तसेच सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येवू नये अशी मागणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा गडचिरोली तर्फे करण्यात आली. जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करतांना प्रभाकर वासेकर, सुरेश भांडेकर, देवाजी सोनटक्के व सुधाकर दूधबावरे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.