बीड - येथील लोकनेते जयदत्त अण्णा क्षिरसागर व डॉ. संदीप क्षीरसागर यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ लिंगायत समाजाच्या विविध संघटनांनी एकत्रित पणे निवेदन देऊन व्यथा मांडल्या. डॉ. संदीप क्षीरसागर यांच्या पत्नी व दोन मुले घरात असतांना घरावर दगडफेक केली. गाड्या जाळल्या. पेट्रोल बॉम्ब सदृश्य वस्तू फेकून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. असे अशोभनीय कृत्य करणारा विरूद्ध कठोर कार्यवाही करून त्यांना शासन करावे असे निवेदन लिंगायत समाजाच्या विविध संघटनामार्फत एकत्रित पणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
डॉ. संदीप पाटील यांच्या सुविद्य पत्नी या घरात असतांना त्यांना दहशतीला कसे सामोर जावे लागले यांची एबीपी माझाची क्लिपहि जिल्हाधिकारी यांना ऐकवण्यात आली. याचा योग्य तपास करून असे निदनीय कृत्य करणारांना कठोर शासन करावे असे निवेदन विविध संघटना मार्फत देण्यात आले.
मराठा समाजाच्या मागणीस आमचा पाठिंबा असतांनाहि घरावर हल्ले व घर जाळण्याच्या प्रकाराचा निषेध करण्यात आला यावेळी. शिवा लिंगायत युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद पाटील लिंगायत महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुदर्शन बिराजदार, उद्योजक उदय चौंडे, मा नगरसेविका छाया ताई चिंदे, विश्वनाथ खडके जिल्हाध्यक्ष तेली समाज, राजेश्वर मोठे पाटील, बाळासाहेब व्हलकंबे, नितीन कंठेकर जिल्हा अध्यक्ष शिवा लिंगायत युवक संघटना, अॅड. अजयकुमार कलशेट्टी, कल्याण घुगरे गवळी समाज, लिंगायत संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ हलकुडे, किशोर भुजबळ तेली समाज युवा नेते, शिवशंकर क्षिरसागर, भागवत कोरे, चंद्रकांत कुल्ले, शुभांगी राऊत, गणेश दोकळे, सुरेश पावटे, नितीन लोखंडे, बबीताताई खडके, कृष्णा खडके, महेश क्षिरसागर, रजत कलशेट्टी, चिल्लरगे आदर्श, हरनाळे राजेश्वर, सौ, रेखा कलशेट्टी, सारीका क्षिरसागर, उमाकांत राऊत, मनोहर पाटील कवठाळी सरपंच उपस्थित होते.