स्वराज्य स्थापनेच्या दरम्यान 142 ओबीसी व दलित मावळ्यांनी छ. शिवरायांना सहकार्य केले. फक्त सरदार कान्होजी जेधे सोडले तर बाकी मातब्बर सरदार व बा्रह्मण घराणी ही मुळात शिवरायांच्या बरोबर नव्हती. विजापुरांचा पराजय होताच मराठा सरदार व ब्राह्मण हे शिवरायांकडे आले. भविष्यात छ. शाहु यांना नावापुरते ठेऊन पेशवेच मालक झाले. हा इतिहास या साठी सांगावयाचा हे स्वातंत्र्य लयास घालवतांना बर्वे नावाच्या व्यक्तीने स्वराज्याचा ध्वज उतरवुन युनियन जॅक फडकवला. सातरच्या गादीवर लक्ष देण्यास याच बर्वेंना पाठविले. काही वर्षात छत्रपतींना देशो धडीस लावणारे हेच बर्वे होते. हा इतिहास आहे. तो कोणत्याच शालेय अभ्यासक्रमात येऊ दिला जात नाही. हे का मांडायचे तर या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भिल्ल, सोनार, रामोशी, कोळी या मंडळींनी पेशवाई संपुष्टात येताच प्रखर लढा दिला. यातील हजारो जनांना गोळ्यांच्या वर्षावात मरण इंग्रजांनी दिले. त्यांचा ही इतिहास कुठे शिकवला जात नाही. संत संताजी, नमाजी माळी, गवार शेठ या सारख्या मंडळींनी संत तुकोबा बरोबर राहून शिवराया साठी ही भुमी अनकुल केली. परंतु इतिहासाची फारकत घेऊन संत रामदासांना शिवरायांचे गुरु बिंबवले जाते. आता हे अभ्यास क्रमात नसेल ही परंतु या अभ्यास क्रमा बाहेर हेच बिंबवले जाते. याचा संदर्भ या साठी की ज्यांना इतिहास नसतो त्यांना भुगोल नसलो. ज्यांना भुगोल नसतो त्यांना कोपर्यात जीवन जगावे लागते. इतिहास निर्माण केल्या नंतर ज्यांच्याकडे धोरण नसते. ज्यांच्याकडे मतदान आहे. पण या मतावर समोरच्याला झुलवता येत नाही. वाकवता येत नाही लढाई जेवढी महत्वाची त्यापेक्षा तह ही महत्वाचा असतो. मतदान जेवढे म्हत्वाचे त्यापेक्षा सत्तेचा लाभ समाजात येण्यासाठी दबाव गट तेवढाच मोठा आहे. आठ टक्के दलित बांधव परंतु त्यांच्या मताची किंमत वसुल करण्यास जी चाल लागते ती पुरे पुर वापरून काँग्रेस व भाजपाला दाखवुन दिले तुम्ही अहात म्हणुन आम्ही आहोत असे नव्हे तर आम्ही आहोत म्हणुन तुम्ही आहात. मग या दलिता पेक्षा जास्त म्हणजे 12 टक्के समाज तेली असताना समाजाचेच बार का वाजतात ?