नागपुर :- विदर्भ तेली समाज महासंघातर्फे दिवंगत मधुकरराव वाघमारे यांची ७४ वी जयंती सेवादल महिला महाविद्यालय सक्करदरा चौक नागपूर येथे साजरी करण्यात आली. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. संजय शेंडे कार्याध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंघ तर प्रमुख मागर्दशक प्रा. डॉ. नामदेव हटवार यांनी मधुकरराव वाघमारे यांच्या जिवनकार्य आणि समाजाच्या विविध स्तरातील समस्यांना सोडविण्यासाठी विदर्भ तेली समाज महासंघाची स्थापना १९९४ ला अमरावती येथे केली. तेव्हापासून तेली समाजासाठी केलेल्या विविध प्रकारच्या सामाजिक कार्यात मोलाचे योगदान आहे. असे मत स्पष्ट केले. तर अँड प्रा. रमेश पिसे यांनी सविस्तर अशी माहिती दिवंग, मधुकर वाघमारे यांचे बद्दल दिली. मीराताई मदनकर यांनी एक सुंदर कविता लिहून आपल्या कवितेतून दिवंगत मधुकरराव वाघमारे त्यांच्या सामाजिक जीवनपट उलगडून दाखवले. मा. संजय शेंडे यांनी आपल्या वक्तव्यातून सांगितले की. समाजातील प्रत्येक व्यक्तीला सामाजिक कार्यात सहभागी करुन घेण्यात सिंहाचा वाटा असून त्यांच्या बोलण्यातून समाजाची उभारणी कशी केले. याबद्दल माहिती दिली.
श्री. राजेंद्र टेकाडे यांनी १९९५ ला मुख्यमंत्री नारायण राणे आणि दिवंग, मधुकर वाघमारे यांच्यासोबत आलेला एक प्रसंग विशद केला यावरून ते किती समाजासाठी समर्पित होते. हे त्यांनी समजावून सांगितले सभेचे प्रास्ताविक श्री. संजय सोनटक्के सचिव यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. राजेंद्र डकरे यांनी केले. त्यावेळी उपस्थित श्री. आनंद नासरे, प्रा. रमेश पिसे, श्री. संजय सोनटक्के, संजय शेंडे, श्री. राजेंद्र डकरे, माणिकराव सालणकर, श्री. पुरुषोत्तम कामडी, शंकर ढबाले, रामेश्वर येळणे, डॉ. विलास तळवेकर, श्री. राजेंद्र टेकाडे, वसंत शेंडवरे, मिराताई मदनकर, वंदना वनकर, शुभांगी घाटोळे आणि इतर सर्व तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.