जुन 2014 चा तेली गल्ली मासिकाचा अंक आम्ही मा. नरेंद्र मोदी विशेष अंक प्रसिद्ध केला होता. एक तेली बांधव पंतप्रधान हा अभिमान जेवढा त्यात नोंदवला. अगदी तेवढेच भविष्यातील धोके ही मुक्काम पोष्ट तेली गल्ली या सदरात मांडलेले होते. पंतप्रधान तेली होऊन काय समाजाला मिळाले हे महत्वाचे आहे. खासदार रामदास अठवले यांनी सांगीतले काँग्रेसने दलितांचे खच्चीकरण केले. ते कसे हा स्वतंत्र मांडणीचा विषय आहे. परंतु याच काँग्रेसची करंगळी सोडून भाजपाच्या कळपात गेले इथे दाखवून दिले कळपात आलोच आहे तर बाबासाहेबांना विसरलात तर आम्ही ही बघा आमच्या बांधवाना घेऊन निघालोच. इथे मते, राजकारण, दबाव याचे प्रयोग झाले. आणि इंग्रजांनी सत्ता रूजवताना जे प्रथम या देशाच्या ताकदीचा पहिला विचार केला तसा भाजपाने केला. आम्ही काय सांगतो आमचे सहा खासदार लोकातुन निवडले गेलेत. या देशाचे पंतप्रधान तेली आहेत. यातुन साध्य काय तर? यातुन मिळाले काय तर ? मराठा व ब्राह्मणांना एक संदेश. बाबारे आम्ही कुणाचे आहोत तर मा. नरेंद्र मोदींचे. एका सरपंचाचा दिवसा ढवळ्या खुन. एका नगरसेवकाचा दिवसा खुन. या बाबत नेते म्हणुन घेणार्यांनी आज पर्यंत कुठे ब्र काढला नाही. प्रश्न स्थानिक आहे. मध्यंतरी मोदी यांची ही पडद्या मागुन जात रस्तयावर आणली होती. इकडे विरोधा पेक्षा अभिमानाने सांगतो मोदी तेली आहेत. या पुर्वी आठवले यांचे उदाहरण याच साठी दिले. त्यांचया धोरणा विषयी माझी काही मते जरूर आहेत. पण त्यांनी जे साध्य केले त्या विषयी मते नाहीत. नुसतीच भाटगीरी करून काय मिळवले ? आज ओबीसी आरक्षणा विषयी भागवतासह काही जन जे बोलतात आज न्याय पालिकेचे एक न्यायधीश मत मांडतात देशाला भ्रष्ट्राचार व आरक्षण ही किड आहे. ही बोलण्याची ताकद 12 टक्के तेली समाजाने दिली. देशाचा पंतप्रधान तेली असणे अभिमान परंतू आरक्षण संपवणे म्हणजे आज मराठा - कुणब्यांच्या हातुन जे बचावले ते सुद्धा जाऊ शकते. यासाठी आपण किती मुत्सदी गिरी वापरली हा प्रश्न आहे. समाजाच्या नुसत्या मागण्या, वधुवर मेळावे, सभा, सत्कार यातच मग्न आहोत. नेतेच आमचे भरकटलेल असतील तर कपाळाला पदे चिकटावून मिरवणारे पदाधीकारी मोठे पणा साठी पाडा पाडी करीत रहाणारच.