तेली समाजाचे राष्ट्रीय नेते,माजी मंत्री जयदत्तआण्णा क्षिरसागर व महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा युवाध्यक्ष तसेच विद्यमान आमदार संदीपजी क्षिरसागर व अन्य ओबीसी नेत्यांना टार्गेट करुन त्यांच्या घरांवर व कार्यालयांवर जमावाने हल्ले करुन नुकसान केले त्याचा जाहीर निषेध करुन रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ संल्लग्न महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा रत्नागिरी जिल्हा जाहीर निषेध करुन मा.राज्यपाल यांना देण्यासाठी मा. निवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करीत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष रघुविर शेलार, कार्याध्यक्ष दिपक राऊत,जिल्हा खजिनदार दिनेश नाचणकर, जिल्हा सल्लागार अनंत भडकमकर, श्री.संत संताजी महाराज जगनाडे पतपेढीचे संचालक अमोल लांजेकर, मंदार आंब्रे उपस्थित होते.