नागपूर :-आशियाई क्रिडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत पदकांची लयलूट केली आहे. भारताने या स्पर्धेत 100 पेक्षा पदके पटकावली असून नागपूरच्या ओजस देवतळेनेही दमदार कामगिरी करत सूवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. त्यामुळे ओजसवर सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. धनुर्विद्या मध्ये ओजस प्रवीण देवतळेने कंपाऊंड तिरंदाजीत सूवर्ण पदक पटकावण्याची कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामगिरीवर पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी त्याचं कौतुक केलं आहे. त्याने शालेय, राज्य आणि देशपातळीवर आपलं कौशल्य दाखवत अनेक मेडल मिळविले आहेत. मात्र देशाचा झेंडा सातासमुद्रापार फडकविण्याचा त्याचा निर्धार होता. त्यात त्याने स्वतःला झोकून देते मोठं यश मिळवलं आहे. त्याने एशियन गेममध्ये गोल्ड मिळवून देशाचा नावलौकिक केला आहे. त्याच्या यशाबद्दल विदर्भ तेली समाज महासंघ च्यावतीने ओजस चे वडील प्रवीण देवतळे यांचे सन्मान चिन्ह आणी पुष्प गुच्छ देवून शास्त्रज्ञ डॉ. प्रा. संजय ढोबळे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. संजय शेंडे कार्याध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंघ तर कार्यक्रमाचे उद्घाटन शास्त्रज्ञ डॉ. प्रा. संजय ढोबळे भौतिकशास्त्र विभाग रातुम नागपूर विद्यापीठ, प्रा. डॉ. विजयाताई मारोतकर कवियत्री व लेखिका, मा. नितीन कुंभलकर सामाजिक कार्यकर्ते, मा. शेखर गुल्हाने सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी, विशेष अतिथी म्हणून मा. रघुनाथ शेंडे अध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंघ, प्रा. डॉ. नामदेवराव हटवार सरचिटणीस, अँड. प्रा. रमेश पिसे संघटक, मा. कृष्णाजी बेले, विलास काळे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन सेवादल महिला महाविद्यालय सक्करदरा चौक नागपूर येथे घेण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. सुरेश वंजारी अध्यक्ष नागपूर शहर प्रास्ताविक अँड. प्रा. रमेश पिसे तर आभार प्रदर्शन संजय सोनटक्के सचिव यांनी केले. त्यावेळी उपस्थित धनराज तळवेकर, प्रेमानंद हटवार, राजेंद्र डकरे, रमेश उमाटे, मिरा मदनकर, वंदना वनकर, शुभांगी घाटोळे, प्रा. सोपानदेव प्रा. अविनाश अवचट, प्रा. सुधिर सुर्वे, ज्ञानेश्वर लांजेवार, मायाताई वाघमारे, अनिल घुसे, पुरषोत्तम कामडी, ज्ञानेश्वर रायमल, पिसे, यवतमाळ, केशवराव शेन्डे, जानकीताई सेलूकर, सुभाष कळंबे, प्रशांत मदनकर, माणिकराव सालनकर, दिपक खोडे, डॉ. विलास तळवेकर, आनंद नासरे, राम कावडकर, राजूभाऊ तळवेकर, कमलाकर राजूरकर, संजय भलमे आणी इतर तेली समाज बांधव कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.