श्री संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव समिती जिल्हा गडचिरोली चे वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्य समाज प्रबोधन व किर्तन कार्यक्रम. रविवार दिनांक १० डिसेंबर २०२३ ला सकाळी ११.०० वाजता * स्थळ : श्री संताजी स्मृती प्रतिष्ठान, सर्वोदय वार्ड पटवारी भवनच्या मागे, आरमोरी रोड, गडचिरोली
अध्यक्ष - मा. संजय येरणे प्रसिध्द साहित्यिक, (संताजी एक योध्दा या प्रसिध्द कादंबरीचे लेखक ), प्रमुख वक्ते - मा. प्रा. विजय गवळी संत साहित्याचे अभ्यासक, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) (विषय : संताजी महाराजांचे चरित्र, समाजाची दशा व दिशा), किर्तनकार - मा. दिपक महाराज भांडेकर प्रसिध्द प्रबोधनकार तथा सप्तखंजरी वादक, वर्धा या प्रसंगी वधू-वर परिचय मेळावा व जिल्ह्यातील विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आहे.
महाराष्ट्राला संतपरंपरेचा मोठा इतिहास आहे. संतांनी तत्कालीन अनिष्ट रुढी, परंपरा व अंधश्रद्धेतून बाहेर काढून समाजात विज्ञानवादी दृष्टीकोन रुजविण्याचा फार मोठा प्रयत्न केला.
"नवसे कन्या - पूत्र होती । तरी का करणे लागे पती"
असा अत्यंत विज्ञानवादी दृष्टीकोन समाजात रुजविणाऱ्या संत तुकारामाच्या पोथ्या इंद्रायणी नदीत समाज कंटकांनी बुडविल्या. तुकाराम महाराजांचे शिष्य श्री संताजी जगनाडे महाराज गावोगावी फिरुन संत तुकारामाचे मुखोदगत अभंग पुनःश्च लिहून काढले आणि समाजाला जागृत करण्याचे कार्य आयुष्यभर केले. परंतु अजूनही समाज अजुनही जुन्या रुढी परंपरा व अंधश्रद्धेच्या जोखंडातून पूर्णत: मुक्त झालेला दिसत नाही.
८ डिसेंबर १६२४ हा दिवस संत जगनाडे महाराजांचा जन्म दिन. त्याचे औचित्य साधून श्री संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव समिती जि. गडचिरोली च्या वतीने समाजाला जागृत करुन समाजात शैक्षणिक व वैचारिक परिवर्तन करण्याचे दृष्टीने समाज प्रबोधन व किर्तनाचा कार्यक्रम १० डिसेंबर २०२३ रोज रविवारला सकाळी ११.०० वाजता आयोजीत करण्यात आलेला आहे. तरी सर्व तेली समाज बंधू-भगिनिंनी मोठ्या संख्येनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. ही विनंती करण्यात आलेली आहे. आयोजक : श्री संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव समिती जिल्हा गडचिरोली.
चला जाऊया गडचिरोलीला संताजीच्या जन्मोत्सवाला...!