संताजी सेवा मंडळ भंडारा व्दारा कोजागिरी व गूणवंत विदयार्थी यांचा सत्कार कार्यक्रम दि.5.11.2023रोजी राञी 8.30 ते11.30 वाजेपर्यत संताजी मंगल कार्यालय भंडारा येथे मा.श्री.कृष्णराव बावनकर अध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली प्रमूख अतिथी मा.डाॅ.श्री.नितिनजी तूरस्कर रा भंडारा, डाॅ.सौ.पूष्पा नितीनजी तूरस्कर रा.भंडारा आणि संताजी सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी, सभाषद बंधू भगिनी यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमूख अतिथी यांचे हस्ते व उपस्थित समाज बांधव यांचे उपस्थितीत श्री. संताजी मंदीर येथे संताजी जगनाडे महाराज यांचे मूर्तीचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.तसेच मंचकाजवळील फोटोला माल्यार्पण करून दिपज्योत प्रज्वलीत करण्यात आली. व कार्यक्रमाची सूरूवात श्री.जाधवराव साठवणे सहकार्यवाह यांचे उत्कृष्ट संचलनाने करण्यात आली.
भारतीय संस्कृतीनूसार सौ. स्मिता भांगे संचालीका यांनी शारदा स्तवन म्हटले.तसेच सौ.रोशनीताई साठवणे,सौ.मिनल साठवणे,सौ प्रियंका साठवणे यांनी स्वागत गित म्हणून पाहूण्याचे स्वागत केले.संताजी मंडळाचे अध्यक्ष ,प्रमूख अतिथी तसेच सर्व पदाधिकारी यांना मंचावर बोलावून स्थानापन्न करण्यात आले.
सर्वप्रथम प्रमूख अतिथी डाॅ.श्री.नितीनजी तूरस्कर यांचे स्वागत सत्कार, मंडळाचे अध्यक्ष श्री.कृष्णराव बावनकर यांचे हस्ते तसेच संचालक मंडळाचे पदाधिकारी यांचे उपस्थितीत शाल,श्रीफळ,पूष्पगूच्छ व स्मृतिचिन्ह देवून करण्यात आले. प्रमूख अतिथी डाॅ . सौ.पूष्पा नितीनजी तूरस्कर यांचे स्वागत सत्कार सौ.दूर्गा डोरले ,सौ.स्मिता भांगे संचालीका यांचे हस्ते शाल,श्रीफळ,पूष्पगूच्छ, व स्मृतिचिन्ह देवून करण्यात आले.
तसेच श्री.कृष्णराव बावनकर अध्यक्ष यांचे स्वागत सत्कार सचिव व संचालक मंडळाचे पदाधिकारी यांचे हस्ते शाल,श्रीफळ,पूष्पगूच्छ व स्मृतिचिन्ह देवून करण्यात आले.तसेच सर्व संचालक मंडळाचे स्वागत बॅचेस लावून करण्यात आले.तसेच प्रतिष्ठित नागरिक श्री.रामदासजी शहारे,श्री.उध्दवजी डोरले,श्री.धनंजय मोहोकर,श्री.मनोहर मेहर,डाॅ.दिपक निर्वाण यांचा स्मृतीचिन्ह व पूष्पगूच्छ देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहूण्याचे परिचय श्री.रूपेश बांगडकर संचालक यांनी उत्कृष्ट पध्दतीने केले.व संताजी सेवा मंडळाचे प्रगतीबाबत सविस्तर माहीती विषद केली.
प्रमूख पाहूणे डाॅ. श्री.नितीनजी तूरस्कर यांनी आपले परिवार समंधी ,शेतीबाबत माहीती दिली.तसेच विविध विषयाबाबतगूणवंत विद्दयार्थ्याना सविस्तर माहीती दिली.व प्रमूख पाहूणे म्हणून निमंत्रित केल्याबद्दल मंडळाचे आभार मानले.
अध्यक्षीय मनोगत अध्यक्षाचे वतीने श्री.अनिल मानापूरे सचिव यांनी व्यक्त केले. गूणवंत विद्यार्थी यांचा सत्कार प्रमूख पाहूणे आणि संचालक मंडळाचे पदाधिकारी यांचे हस्ते करण्यात आला.वर्ग 12वी मध्ये सर्वात जास्त गूण मिळविणारे गुणवंत प्रथम टाॅपर विद्यार्थी कु. नंदीनी संजय साठवणे रा.भंडारा 99.50 टक्के तसेच कु.पायल सुरेश मेहर रा.भंडारा 94.50 टक्के यांचा सत्कार रोख बक्षीस, प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह व पूष्पगूच्छ देवून करण्यात आला.तसेच 12वी मध्ये 85 टक्केपेक्षा जास्त गुण मिळविणारे आणखी 6 विद्यार्थी यांचा सत्कार सूध्दा करण्यात आला.
शिष्यवृत्ती परिक्षा 8वी मध्ये कु.प्रणोती राजेश सेलोकर रा. भंडारा ही टाॅपर असल्यामूळे त्यांचा सत्कार रोख बक्षीस,प्रमिणपञ, स्मृती चिन्ह पूष्पगूच्छ देवून करण्यात आला. तदनंतर 10 वी मध्ये सर्वात जास्त गूण मिळविणारे गूणवंत विद्यार्थी प्रथम टाॅपर कु.शुभांगी अरूण गायधने कुशारी, 96.60 टक्के, आणि व्दितीय टाॅपर चि.गौरव दिपक निर्वाण रा.भंडारा, 96.00 टक्के यांचा सत्कार पाहूणे हस्ते रोख बक्षीस,प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह,पूष्पगूच्छ देवून करण्यात आला.तसेच 85 टक्केपेक्षा जास्त गूण मिळविणारे आणखी 19 विद्यार्थी यांचा सत्कार सूध्दा संचालक मंडळाचे पदाधिकारी यांचे हस्ते करण्यात आले. गोवा येथे झालेल्या सात राज्याच्या पावर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविलेली सिध्दी सुरेंद्र मदनकर हिच्या घरी जाऊन मंडळा तर्फे स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करून समोरच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यावेळी अनिल मानपुरे, मंगेश वंजारी, जाधवराव साठवणे,विकास मदनकर,संजय बाळबुधे, विनोद भुरे उपस्थित होते तसेच
सदर कार्यक्रमास प्रमूख पाहूणे सर्वश्री डाॅ.श्री.नितीनजी तूरस्कर डाॅ.सौ.पुष्पा तूरस्कर रा. भंडारा, संताजी सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. कृष्णराव बावनकर, कार्यवाह श्री. अनिल मानापूरे, कोषाध्यक्ष श्री.सूधीर वाघमारे, उपाध्यक्ष श्री हिरालाल बांगडकर, श्री. मिलिंद मदनकर, श्री. तूलाराम साकूरे, सहकार्यवाह श्री. मंगेश वंजारी, श्री. जाधवराव साठवणे, श्री.वामन देशमूख, संचालक श्री.प्रकाश भूरे,श्री.महेश आकरे,श्री.प्रशांत शहारे,श्री.विकास मदनकर,श्री.संजय बाळबूधे,श्री रूपेश बांगडकर, संचालीका सौ. दूर्गा डोरले, सौ.स्मिता भांगे, श्री. रामेश्वर वंजारी, संताजी मंडळाचे सर्व सभासद, मान्यवर निमंञित मंडळी, गूणवंत विद्यार्थी तसेच तेली समाज बांधव, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
कार्यक्रमाचे संचलन श्री.जाधवराव साठवणे सहकार्यवाह यांनी केले. आणि उपस्थिताचे आभार श्री. सूधीर वाघमारे कोषाध्यक्ष यांनी मानले
स्वरूची फराळ, नास्ता, कोजागिरी दूध प्रसाद सर्वाना देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.