हे वास्तव मी मांडत होतो. परंतु तैलिक साहू महासभेचे केंद्रीय अध्यक्ष आमदार जयदत्त क्षिरसागर व आ. विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक धोरणावर प्रथमच जे सत्य मांडले त्या बद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या शैक्षणिक धोरणावर टिका करिताना प्रश्न उभा केला. आपण निवडणुन आलात ते ओबीसी मतावर त्यांच्यावर अन्याय. लोकसभेच्या निवडणुकी पुर्वी मोदींच्या भावा बरोब कुठे तरी मिटींग झाला नंतर. तमाम पदाधीकार्यांची एक मिटींग नंदुरबार येथे झाली. आणी 25 ते 0 टक्के प्रत्येक मतदार संघात विदर्भामध्ये तेली मतदार असल्याने लोकसभेत तेली मते निर्णायक ठरली. हीच रणनीती विधान सभेसाठी वापरुन विदर्भात भाजपा विजयी होऊ शकाला. मुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांच्याच मतदार संघात तेली मतदान हे 35 ते 40 टक्के आहे. ही सर्व एक गठ्ठा मते फडणवीसांनाच मिळाली आहेत. या तेली समाजाने मते दिली म्हणुन भाजपा व फडणवीस सत्तेत गेले. गत वर्षात समाजाला काय दिले ? हा प्रश्न विचारणे समाजाचा अधीकार आहे. ओबीसी विद्यार्थींना ना फी दिली ना तेली समाजासाठी नविन विकास महामंडळ स्थापन केले. ना तेली सक्षम होईल अशी धोरणे राबवली. कायद्याच्या पळवाटा शोधून स्थगीती दिलेल्या मराठा आरक्षणाच्या जागा भरावयास द्रुतगतीने पाऊले उचलली. तेली मतावर पोसलेल्या या मंडळींनी आपलीसत्ता टिकावायला मराठा समाजाचा पदर पकडला आहे. मराठा - कुणबी ही अस्तीवात नसलली जात आज तेली समाजाची स्थानीक स्वराज्य संस्थेतील सत्ता संपुष्टात आणत असताना. खुले आम मराठा - कुणबी ही प्रमाणपत्र दिली जातात. काँग्रेसने विदर्भात व महाराष्ट्रात हेच केले. हेच केले म्हणुन काँग्रेसचे बारा वाजले. फडणवीस साहेब तुमचे ही बारा हा समाज वाजवू शकतो. रेशीम बागेतुन रचला जाणार्या ब्राह्मण इतिहासा पेक्ष. खरा इतिहास जर तपासला तर आसली दडपशाही तेली, माळी, सुतार कुंभार आशा जातींनी संपवीली आहे.