नगर :- अहमदनगर शहरातील एैतिहासिक तेली खुंटावरील घोडनदीकर कॉनर वरील जेष्ठ बांधव. उमेदीच्या काळात अनेक व्यवसायात धडपडले. शेवटी मेडीकल व्यवसाय व त्या नंतर मे. मनोहर एजन्सी या व्यसायात स्थिर झाले. लिज्जत पापड, बिग सफारी उदबत्ती या व इतर कंपन्याची एजन्सी घेऊन स्थानिक ठोक व किरकोळ विक्री करीत असताना त्यांनी एजन्सी द्वारे नगर शहर व ग्रामीण भागात ते खेडो, पाड्यात, वाड्या व वस्तयावर जात असत. व्यवसायामुळे ग्रामीण व शहरी भागातील जवळचा संबंध मिर्नाण झाला.
महाराष्ट्र पातळीवर आज महाराष्ट्र तेली महासभेचे कानठाळ्या बसतील आशा स्वरुपात कितीही ढोल बडवत असले तरी कै. प्रकाश शेठ यांची भुमीका आज पुसली आहे. त्यांच्या कार्याच्या वाटचाली विषयी मतभेद असतील ही नव्हे जरूर असावेत. पण त्यांनी जे केले त्याची नोंद ठेवणे तेवढेच आवश्यक आहे.उमेदीच्या काळात नगर शहरात आपला ठसा उमटवल्या नंतर ते व श्री. गोकूळ काळे हे श्री क्षेत्र सुदूंबरे संस्थेत पदाधीकारी म्हणून कार्यरथ झाले. संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काही काळ कामकाज पाहिले. याच दरम्यान कै. केशरकाकु क्षिरसागर यांचा संबंध आला. महाराष्ट्रात प्रथम नगर शहरात त्या खासदार होताच जंगी सत्कार केला. केशरकाकु महाराष्ट्र तेली महासभेच्या अध्यक्षा होत्या. विदर्भात रूजलेली ही संघटना मराठवाड्यात नावा पुरती होती. पण हीच संघटना उरलेल्या महाराष्ट्रात नावा पुरती ही नव्हती. अहमदनगर शहरात देशपातळीवरील मिटींग 1994 च्या दरम्यान आयोजित करण्यात कै. प्रकाशशेठ यांनी पुढाकार घेतला. याच जाहिर मिटींग मध्ये काकु देशपातळीवर अध्यक्षा झाल्या. महाराष्ट्रा साठी कोण ही चर्चा चालु झाली तेंव्हा खा. रामदास तडस यांचे नाव आले. आणि सर्व सभागृहाने एक मताने त्यांची निवड केली. या निवडी पासुन उर्वरीत महाराष्ट्रात तेली महासभेची पाऊली उमटवू लागली. आगदी सुरूवातीस या परिसरात खा. तडस साहेबांना निंमंत्रित करून त्यांनी तेली समाजाचे मेळावे आयोजित केले होते. यातुनच तेली महासभा ही ओळख समाजाला झाली. राज्य पातळीवर काम करण्याची संधी उपाध्यक्ष या नात्याने त्यांना मिळाली होती. 1992 च्या दरम्यान अहमदनगर जिल्हा तेली समाज संस्था होती. परंतू तेली महासभा उभी करण्यास बरेच यश मिळाले.
मृत्यु पुर्वी अगदी दहा दिवस ते व मी समाज प्रक्रिया बाबत चर्चा करताना त्यांनी आपली खंत व्यक्त केली होती. महासभा उभारल्या नंतर एक अडगळ म्हणुन ज्या ज्या व्यक्ती होत्या व आहेत. त्यांना मानान सन्मान नको परंतु कार्याची एक जाणीव असावी इच्छा सांगीतली. ते तेली गल्ली (गावकुस) मासिकाचे एक मार्गदर्शक होते. त्यांना सर्व समाज बांधवा तर्फे भावपुर्ण श्रद्धांजली.