स्वातंत्र्यातील योद्धा संत जोगापरमानंद व आमचे नेभळटपण (भाग 5) - मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
समता, स्वातंत्र्य यांचा बौद्ध काळ संपवल्या नंतर ब्राह्मण्यचे राज्य सुरू झाले. यादवांच्या काळात तर नावाला राजे यादव पण कारभार हेमाडपंत हे ब्राह्मण हाकत होते. ही जुलमी सत्ता नष्ट होताच मोंगल सत्ता आली. तीला उतरती कळा येताच पेशवाई आली. पेशवाई जाताच इंग्रजी सत्ता आली. इंग्रज जाताच काँग्रस आली. काँग्रेस जाताच भााजपा आली. नुसती सत्ता बदलली म्हणजे स्वातंत्र्य का ? आज विकासाचा पैसा आपल्या साठी येतो का ? घरातला मुलगा हुशार असुन उपयोग नाही तर की पैसे देतो यावर प्रवेश आसतो. मंडलने राखीव जागा दिल्या. त्या माराठ्यांनी मनगट व पैसा या बळावर पळवल्या. स्वातंत्र्या पसुन किमान शंभर ही आमदार समाजाचे होऊ शकले नाहीत फक्त दहा टक्के लोकसंख्येच नुसतेच बेसुर उमटत रहातात. आज ही मराठा आमदार निम्या पेक्षा जास्त आहेत. ओबीसी 52 % सांगतो मग यातील तेली, माळी, सुतार, नाभीक यांचा मुख्यमंत्री होण्याचे का शक्य झाले नाही. या देशाचे पंतप्रधान मा. मोदी साहेब ओबीसी आहेत. ते तेली आहेत का नाहीत या विषयी मागे मी मांडलेच आहे. ते जर असतील तर त्यांना हे असले स्वातंत्र्य का नष्ट करता येत नाही उलट हिंदूंच्या नावा खाली ब्राह्मण्य जोरात असेल. हे ब्राह्मण्य जर भविष्याची गुलामी लादण्याची पुर्व तयारी करीत असेल तर स्वातंत्र्याचा जो आज तोंडवळा आहे तो ही उद्या नसेल.