आरमोरी :- नेहमी सामाजिक, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन लोकहिताचे कार्य करणाऱ्या युवारंग लोकहीत संघटना ,आरमोरी व राजमाता जिजाऊ कराटे ग्रुप आरमोरी तर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आज दि.८ डिसेंबर २०२३ ला सकाळी ७:०० वाजता जुना बसस्टँड स्थित श्री.संताजी जगनाडे महाराज प्रतिष्ठान येथे पुष्पहार अर्पण करून जय जिजाऊ , जय शिवराय, जय तुकोबा, जय संताजी चे जयघोष देऊन जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन राजमाता जिजाऊ कराटे ग्रुप चे मुख्य प्रशिक्षक राजुजी घाटूरकर सर प्रमुख अतिथी म्हणुन युवारंग च्या महिला सदस्या चंदाताई राऊत ,स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समितीचे अध्यक्ष चारुदत्त राऊत सर ,युवारंग चे संघटक रणजितजी बनकर, राजमाता जिजाऊ कराटे ग्रुप चे सहप्रशिक्षक राजुजी अतकरे सर, युवारंग चे उपाध्यक्ष मनोज गेडाम,राजमाता जिजाऊ कराटे ग्रुप चे संयोजक रोहित बावनकर , युवारंग चे प्रचारक आशुतोष गिरडकर , युवारंग चे सदस्य लीलाधर मेश्राम, सूरज नारनवरे , शाम सावसाकडे राजमाता जिजाऊ कराटे ग्रुप चे विद्यार्थिनी उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राजुजी घाटूरकर सर यांनी श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवनचरित्रावर मार्गदर्शन केले तर चंदाताई राऊत यांनी श्री. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व श्री. संताजी जगनाडे महाराज या गुरू शिष्य यांच्याबदल माहिती दिली ज्यावेळी समाज कंटकांनी तुकाराम महाराजांची अभंग गाथा त्यांना इंद्रायणी च्या पात्रात बुडविण्यास बाध्य केले त्यावेळी त्यांचे शिष्य संताजी जगनाडे महाराज यांना लहान वयापासूनच तुकाराम महाराजांचे अभंग कंठस्थ होते आणि ते सर्व अभंग श्री. संताजी जगनाडे महाराजांनी जसे च्या तसे लिहून काढले आणि त्यामुळेच आज आपल्याला श्री.संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे अभंग वाचायला मिळतात म्हणूनच श्री संत संताजी जगनाडे महाराजांचे कार्य महान आहेत असे त्या बोलत होत्या या कार्यक्रमाचे संचालन आशुतोष गिरडकर यांनी केले तर आभार लीलाधर मेश्राम यांनी मानले.