संताजी ब्रिगेड तेली समाज महासर्व महासभा तर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संताजी जयंती ही थाटामाटाने मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात पारडी येथून संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतीमेसह भव्य बाईक रैली व भव्य शोभायात्रा करण्यात आली. त्याच प्रमाणे ढोल ताशा पथक व पारंपारिक आखाड्याचे सुद्धा प्रात्यक्षिक करण्यात आले. शाळेत शिकणाऱ्या मुलांकडून केले जाणारे आखाड्याचे खेळ उत्साह निर्माण करणारे होते.
ह्या बाईक रैली चे समापन जगनाडे चौक, नागपूर येथे करण्यात आले. तेथे रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर व भव्य महाप्रसादाचे आयोजन संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा कडून करण्यात आले होते. ह्या सर्व सामाजिक उपक्रमांना समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाजातील विविध संघटन आज बंधू भावाने जगनाडे चौक येथे एकत्रीत आले होते. आजच्या ह्या सोहळ्याने समाजाची मोट एकत्रीत बांधण्याचे काम केले.
वरील कार्यक्रमास जिल्ह्यातील गणमान्य व्यक्तींनी भेटी देऊन संत जगनाडे महाराजांना आदरांजली वाहीले, संस्थापक अजय धोपटे अध्यक्ष विजय हटवार,कोषाध्यक्ष रुपेश तेलमासरे, सहसचिव हितेश बावनकुळे, सदस्य नंदु धोपटे, सदस्य रमेश वंजारी,सदस्य अंकुश येळणे, संघटक प्रमुख गजानन तळवेकर, विदर्भ अध्यक्ष लोकनाथ भुरे, नागपूर जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कुजलकर, महासचिव महादेव धोपटे, नागपूर शहर अध्यक्ष सुनिल मानापुरे, महासचिव रोहन मोटघरे,उपाध्यक्ष कुमार बावनकर ,सहसचिव परेश भनारे, उपाध्यक्ष देवेंद्र बारई,उपाध्यक्ष विठ्ठल तडस,सहसचिव विनोद पिसे, मीडिया प्रभारी अजय काबळे, दक्षिण नागपूर अध्यक्ष संजय बडवाईक, दक्षिण पश्चिम शैलेंद्र आंबुलकर, पूर्व नागपूर अध्यक्ष प्रतीक बावनकर, उपाध्यक्ष सुरेश थोपटे, विदर्भ सहसंघटक प्रमुख प्रतिभाताई खोब्रागडे नागपूर जिल्हा अध्यक्षा कविता रेवतकर, नागपूर शहर प्रमुख चित्रा माकडे, उपाध्यक्ष प्रणोती मानापुरे, प्रवक्ता डॉ,दिपा हटवार, पूर्व नागपूर अध्यक्षा नर्मदा तडस, दक्षिण अध्यक्षा, सोनाली टिकले, दक्षिण पश्चिम अध्यक्षा सोनल बावनकुळे, मध्य नागपूर, रजनी वैरागडे, युवा आघाडी व महिला आघाडी व वैद्यकीय आघाडी व संताजी ब्रिगेड औधोगिक मंच, संताजी ब्रिगेड वधू वर परिचय मंडळ पदाधिकारी,व अनेक समाज बांधव उपस्थित होते.