जवळा - तिळवण तेली समाजाचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाणारे वारकरी संप्रदायातील श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे जवळे ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये महिलांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य कृष्णाजी बडवे, पारनेर तालुका तिळवण तेली समाज पारनेर उपाध्यक्ष शिरीष शेलार यांनी संताजी महाराज जगनाडे यांच्या जीवन चरित्रा बद्दल आपल्या भाषणातून सांगितले. ग्रामपंचायत सदस्या सोनाली संदीप सालके म्हणाल्या की, पुढील भावी पिढ्यांना संताजी महाराज जगनाडे हे कोण होते, तसेच या थोर महा संतांची महती चिरंकार टिकावी, म्हणून शालेय अभ्यासक्रमामध्ये त्यांचे जीवन चरित्र येणे, ही काळाची गरजेचे आहे.
श्री संत संताजी महाराज जगनाडे हे फक्त तेली समाजाचे नसून वारकरी संप्रदायाचे व इतर समाजालाही मार्गदर्शक म्हणून ओळखले जाणारे जगनाडे महाराज आहेत, इतर संत मेहान थोर महापुरुषांचे जसे दैनिकांमध्ये जयंती महोत्सव पुण्यतिथी प्रसंगी माहिती प्रसिद्ध होते, त्या पद्धतीने जगनाडे महाराजांची का येत नाही, ही खंत समाजाने यावेळी व्यक्त केली आठ डिसेंबर २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगनाडे महाराजांना राष्ट्रीय संत म्हणून घोषित केलेले आहे त्यामुळे पुढील जयंती पुण्यतिथी या दिवशी तरी जगनाडे महाराजांची माहिती होणे, हे गरजेचे आहे, असे शिरीष शेलार यावेळी म्हटले.
याप्रसंगी जवळे गावचे माजी सरपंच सुभाष आढाव, माजी उपसरपंच जयसिंग सालके, ग्रामपंचायत सदस्य सोनाली सालके, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संदीप लक्ष्मण सालके, भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य कृष्णाजी बडवे ,जालिंदर सालके,नाथाजी रासकर, विविध कार्यकारी सेवा संस्था अध्यक्ष गोरख आढाव, तिळवण तेली समाज तालुका उपाध्यक्ष शिरीष शेलार, भाऊसाहेब शेलार, मदन शेठ रत्नपारखी, प्रदीप समावेशी, सुभाष शेलार, राजेंद्र रत्नपारखी, मधुकर लोखंडे, प्रताप पठारे, स्वप्निल शेलार, ऋषिकेश शेलार, उमेश शेलार, ग्रामसेवक शिवाजी खामकर, तिळवण तेली समाजातील ज्येष्ठ महिला राधाबाई शरद शेलार, सुवर्णा शेलार, उल्का शेलार, शारदा शेलार, द्वारका शेलार, यशोदा शेलार, श्रद्धा शेलार, दिपाली रत्नपारखी, शितल शेलार आणि समाज बांधव उपस्थित होते .