नागपूर. संत संताजी स्मारक समिती जगनाडे चौक नागपूर यांच्या वतीने शुक्रवारी संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार कृष्णा खोपडे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी 'संताजी अध्यासन केंद्र सुरू करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली. संताजी आर्ट गॅलरीचीही त्यांनी पाहणी केली.
तत्पूर्वी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर महाराजांना पंचामृताने स्नान घालण्यात आले व स्मारक समितीचे अध्यक्ष यशवंत खोब्रागडे यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले. संताजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी संताजींचे हजारो अनुयायी आले होते. या कालावधीत रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात व्यासपीठावर चंद्रशेखर बावनकुळे, संदीप क्षीरसागर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुंजन देशमुख, राजेंद्र गिल्लूरकर, रमेश डोकरीमारे, सचिन काळबांडे, स्वप्नील वरंबे, निखल भुते, अमिता हटवार आदींनी परिश्रम घेतले.
संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिका मुख्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जगनाडे महाराज याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त सुरेश बागले, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, बाल्या बोरकर, मनीष सोनी, अमोल तपासे, श्री संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्राचे सुभाष घाटे, मंगेश , प्रवीण बावनकुळे, रुपेश कमळे, डॉ. संजय मुळे उपस्थित होते. अतुल आके, प्रमोद बारई, घनश्याम बावनकुळे, अनिल पेटकर, अनिल पाटील, मिलिंद चकोले, बंटी घनमारे, अतुल घारपेंडे, हेमंत डोरले, सुभाष तडस आदी उपस्थित होते.
जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचे महान कार्य करणाऱ्या संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त महावितरणतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. महावितरणच्या काटोल मार्गावरील विद्युत भवन येथील मुख्यालयात प्रादेशिक संचालक सुहास रंगारी आणि परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अधीक्षक अभियंता अमित परांजपे, राजेश नाईक, सहायक महाव्यवस्थापक प्रदिप सातपुते, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, वरिष्ठ व्यवस्थापक अनुजा पात्रीकर याचेसह अभियंते, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.