पिंपरी, ता. ८ : पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. "थोर संत संताजी जगनाडे महाराजांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्ता आणि उत्तम स्मरणशक्तीच्या आधारे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या गाथा पुनर्लेखनाचे काम केले आणि आपल्या कर्तव्यदक्षतेचा उत्तम परिचय सर्वांना दिला,' असे मत अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास उपायुक्त मनोज लोणकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, श्री. संताजी महाराज पालखी सोहळ्याच्या माजी अध्यक्षा ९० वर्षांच्या बनारसी राऊत, सामाजिक कार्यकर्ते अनिल राऊत, भरत चौधरी, संजय शेलार, राजेश चौधरी, गोविंद चौधरी, किशोर चौधरी, सचिन साटेकर, सुहास शेटे, प्रथमेश आंबेरकर, सुनील खुर्देकर, दिनेश दिवटे, अक्षय खानविलकर, रत्नप्रभा चौधरी, निलांगी राऊत, डॉ. सरोज आंबिके, डॉ. गणेश आंबिके, संतोष साखरे, शिवराज शेलार आदी उपस्थित होते. संत श्री संताजी जगनाडे महाराजयांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील सुबरे या गावी झाला. त्यांनी भजन कीर्तनातून समाज प्रबोधन केले असून, त्यांचे अभंगही प्रसिद्ध आहेत.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade