धुळे - खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील श्री संताजी महाराजांची ३९९ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.जयंतीच्या निमित्ताने धुळे महानगरातील राजवाडे बँके जवळ असलेल्या गुरु शिष्य स्मारकातील श्री संताजी महाराज व तुकाराम महाराज यांच्या पुतळ्यांचे पूजन धुळे महापालिकेच्या महापौर सौ. प्रतिभा चौधरी,विरोधी पक्षनेत्या सौ.कल्पना महाले, माजी महापौर सौ.जयश्री अहिरराव,माजी नगरसेवक सुनीलकाका महाले,गुरु शिष्य स्मारक समितीचे अध्यक्ष कमलाकर अहिरराव, भगवान चौधरी मुक्टी,भैय्या पहिलवान,मोतीलाल चौधरी,कैलास थोरात, पोपटराव चौधरी,अरुण बोरसे, युवराज चौधरी, रामेश्वर चौधरी,सुभाष जाधव,मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी,सचिव रवींद्र जयराम चौधरी, अशोक छगन चौधरी वाघाडी, राजेंद्र माधवराव बागुल,कार्याध्यक्ष मनोज मधुकर चिलंदे, उपाध्यक्ष जयवंत रामदास चौधरी, धुळे शहर अध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी,सौ.सुमनकाकू महाले,महिला आघाडीचे अध्यक्ष सौ.मालती चौधरी,सविता चौधरी,सौ.भारती चौधरी, सौ.दीपिका चौधरी, श्रीमती आशा चौधरी छोटूभाऊ चौधरी वलवाडी,गिरीश राजाराम चौधरी,भगवान भालचंद्र चौधरी या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभावर ध्वज उभारून चतु:शत शताब्दी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.श्री संताजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आज पासून या महोत्सवाचा शुभारंभ होऊन दर महिन्याला एक कार्यक्रम घ्यायचा व पुढील वर्षीच्या जयंतीच्या दिवशी महोत्सवाचा समारोप करायचा असा संकल्प यावेळी खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने करण्यात आला.
वर्षभरामध्ये शिरपूर तालुक्याच्या खाणेसुमारी पुस्तिकेचे प्रकाशन,वधु वर परिचय मेळावा,चतु: शत शताब्दी महोत्सवानिमित्ताने ४०० समाजसेवक बंधू-भगिनींचा सन्मान सोहळा,श्रीक्षेत्र सदुंबरे येथे समाज बांधवांची पारिवारिक सहल,विद्यार्थी गुणगौरव सोहळा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन संपूर्ण वर्षभरामध्ये करण्यात येणार असून दर महिन्याला एक कार्यक्रम घेण्याचा संकल्प यावेळी मंडळाचे वतीने जाहीर करण्यात आला.
फटाक्यांच्या आतशबाजी सह अत्यंत उत्साहात महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीच्या समारंभासाठी मंडळाचे उपाध्यक्ष किशोर पुंडलिक चौधरी, चंद्रकांत श्रीराम चौधरी, अमोल हिरामण चौधरी,गजानन एकनाथ चौधरी,महेश दौलत चौधरी, किशोर हरी चौधरी,योगेंद्र नामदेव थोरात,अतुल सुरेश वाघ,अरुण चौधरी,जगन्नाथ शंकर चौधरी,भाऊसाहेब चौधरी वरखेडी,सतिष बत्तिसा,महिला आघाडीच्या श्रीमती लताताई चौधरी,सौ.रंजना चिलंदे, सौ.कल्याणी चौधरी,सौ.समिधा सुर्यवंशी यांच्यासह सर्व पदाधिकारी बंधू-भगिनींनी परिश्रम घेतले. यावेळी समाजातील अनेक मान्यवर व समाजसेवक बंधू-भगिनी उपस्थित होते.