अकोला - संताजी सेना अकोला जिल्हा शाखेच्या वतीने तेली समाजाचे आराध्य दैवत व संत तुकाराम महाराजांनी विषद केलेल्या मुळ तुकारामगाथेचे लेखनिक श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त अकोला शहरात शुक्रवारी प्रमुख रस्त्यावरून शोभायात्रा काढण्यात आली.
या शोभायात्रेत सर्व तेली समाज बांधव, भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रेत संताजी महाराजांची मुर्ती असणाऱ्या रथासह, घोडे, संस्कृतीचे दर्शन घडवणारे देखावे तसेच दिया टाळकरी मंडळे सहभागी झाले होते. या शोभायात्रेची सुरुवात श्री संताजी महाराजांच्या रथाचे पूजन करून करण्यात आली. | टाळमृदंगाच्या गजरात संताजी महाराजांची शोभायात्रेची सितला माता मंदिर, जयहिंद चौक, सिटी कोतवाली, गांधीचौक मार्गे खुले नाट्यगृह येथे सांगता करण्यात आली
यावेळी संताजी सेना जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, उपजिल्हाप्रमुख अॅड. देवाशिष काकड, राठोड पंच मंडळ अध्यक्ष दिलीप नायसे, गोपाल राऊत किशोर वानखडे, शुभम बोडखे अँड. आनंद गौदे, दिनेश मोंबळे, पंजाब भागवत, बाळू भागवत विश्वनाथ भागवत, कैलास दळवी, सचिन आगाशे, निशांत राठोड, अतुल राठोड, विकास राठोड, पवन गावत्रे, अंकुश निळे, विशाल बोरे, विशाल असलमोल, बालमुकुंद भिरड, नितिन झापर्डे, रमेश गोतमारे, किरण बोराखडे, राजू गोतमारे, गणेश बोराखडे, राहुल धनभर, अभिजीत निवाणे, शुभम राजूरकर, विनोद नालट, अमर भागवत, गजानन बोराळे, प्रा. प्रकाश डवले, डॉ. योगेश साहू, प्रतिक देंडवे, राजेश असलमोल, दिलीप क्षीरसागर, अनिल वानखडे, शशी चोपडे, ओम साकरकार, रवी भागवत, मनोज जुमळे, रेखा नालट, प्रशंसा अंबेरे, अॅड. अकोटकर, सागर राठोड, दिलीप मांडे श्रीकांत धनगर यांच्यासह अनेकांची उपस्थीती होती.
संताजी सेनेतर्फे काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे महानगरातील प्रमुख मार्गावर विविध राजकिय पक्ष. संस्था-संघटना सेवाभावी संस्थानी संताजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून शोभायात्रेचे स्वागत केले. तसेच शोभायात्रा मार्गावर कुठेही कचरा होऊ नये, या उद्देशाने स्वच्छता पथक कार्यरत होते.
या शोभायात्रेत ठिकठिकाणी संत जगनाडे महाराज यांचा जयजयकार करण्यात आला. संताजी महाराज शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी तेली समाज कार्यकारीणी, तेली समाज युवक आघाडी, महिला आघाडी पदाधिकारी, कार्यकर्तासह तेली समाज बांधवानी परिश्रम घेतले.