खामगाव - संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील सुदुंब्रे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. विठोबा जगनाडे व आई मथाबाई हे विठ्ठलभक्त होते. त्यामुळे संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. संत श्री जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्या पैकी एक झाले. संपूर्ण महाराष्ट्र भर श्री संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी होत आहे.
ग्राम ढोरपगाव येथील ग्रामपंचायत ला ही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंती निमित निलेश हीवरकर गुरुजी यांनी जगनाडे महाराज यांच्या जीवन चरित्र तसेच त्यांची जीवनपर्वी माहिती दिली. या जयंतीला ग्राम पंचायत सरपंच सौ. वनमाला संदीप मुंढे यांच्या हस्ते हार आणि पुष्पार्पण करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक धंदर, पंचायत समिती सदस्य समाधान मुंढे, संदीप मुंढे, मुख्याध्यापक खडारे सर, निलेश हिवरकर सर, पिंटू चोपडे, माजी पुरुषोत्तम धुरंधर, अजाबराव तांगडे, राहुल मुंढे, प्रकाश खेडकर, भगवान जसन पुरे, गजानन जसपुरे, मंगेश खेडकर, अमोल खेडकर, अमोल खेडकर, अमोल तायडे, सतीष तायडे, धनजय खेडकर, संतोष जसंनपुरे वासुदेव जसपुरे, कैलास मानकर, किसन हेलोडे, रोशन धुरंधर, बिलाल खान, ज्योतिराम इंगळे व इतर गावकरी मंडळी उपस्थित होते. या जयंती कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन समाजसेवक राहुल पाटील मुंढे यांनी केले.