शुक्रवार दिनांक ८ डीसेंबर २०२३ रोजी श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती सकाळी साडे अकरा (११-३०)वाजता रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ संपर्क कार्यालय,डाॕ.पंकज बंदरकर यांचे घर, तेली आळी रत्नागिरी येथे रत्नागिरी तालुका व जिल्ह्याच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. यावेळी तेली समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या संताजी महाराजांच्या जयंतीला रत्नागिरी जिल्हा व तालुक्याचे पदाधिकारी,समाज बंधुभगिनी, हीतचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.या उत्साही वातावरणात माजी जिल्हा खजिनदार सुरेश निंबाळकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी रघुविर शेलार,दिपक राऊत,बिपिन बंदरकर,संदीप पवार,सचिन (बबलू)कोतवडेकर,सचिन लांजेकर,रुपेश शेलार,काशिनाथ सकपाळ,विजय पुनसकर,मंदार आंब्रे,भाई राऊत,बाळकृष्ण शेलार,हेमंत राऊत,अमोल लांजेकर,जेष्ठ माजी नगरसेवक राजन शेट्ये,सौ.सुवर्णा पावसकर,सौ.प्रियंका रहाटे गुहागर,सौ.विणा बळगे,मयुर बळगे,प्रदीप आंब्रे,स्वप्नील सकपाळ,अजय नाचणकर,वायंगणीचे पावसकर,शरद पावसकर इत्यादी सर्व तेली समाज बंधुभगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.आजच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अल्पोपहारचा खर्च रत्नागिरी तालुक्याचे सचिव सन्माननिय रुपेश शेलार यांनी केला.त्यांना धन्यवाद देण्यात आले.जिल्हा संपर्क कार्यालयात सर्व समाज बंधुभगिनींनी कार्यक्रम यशस्वी केला म्हणून उपस्थित सर्वांचे जिल्हाध्यक्ष रघुविर शेलार यांनी आभार मानले.