साळवा - ज्याचा नोहे भंग तोची जाणावा अभंग देह आपुला भंगतो माती मिळोनिया जातो. त्याचे होईनाच काही अंतरी शोधुनिया पाहि प्राण जातो. यमपाशी दुःख होते ते मायेशी संतु म्हणे असा अभंग गाईला. पुढे चालु केला देहावरी, याद्वारे समाजाला जीवनाचा अर्थ उलगडणारे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या फोटोचे पूजन व माल्यार्पण करून शुक्रवारी (८ डिसें.) जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी गट ग्रामपंचायत मांढळच्या सरपंच सोनुताई निरगुळकर, उपसरपंच सुधीर पिल्लेवान, सामाजिक कार्यकर्ते विनय गजभिये, महादेव कळंबे, किशोर कुर्जेकार, अजय निरगुळकर, संजय निरगुळकर, कैलास गवळी, विष्णू खंडाळे, शामराव ईटनकर, सुखदेव जिबकाटे, गोपाल दिगोरे, संगिता पडोळे, गिता मेश्राम, मिना मेश्राम, रजंना वैद्य, पाडुरंग मेश्राम, तुकाराम घुघुस्कार आदी उपस्थित होते.