छत्रपती संभाजीनगर येथे तेली समाजाच्या वतीने संताजी चौक एन २ सिडको, राजीव गांधी नगर येथे आभिवादन करण्यात आले. संताजी चौकाच्या नामफलकाचे पूजन माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष राधाकिसन सिदलंबे हे होते.
यावेळी जय संताजी युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ सुरडकर यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत असे सांगितले कि,ज्यावेळी तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणी मध्ये बुडवल्या, हि बातमी कळताच तुकाराम महाराज अन्न पाणी सोडून बसले, त्यावेळी संत संताजी जगनाडे महाराजांनी गावोगावी जाऊन त्या गाथा पुन्हा लिहून तुकाराम महाराजांचे उपोषण सोडवले. साडे चारशे वर्षा पूर्वी शिक्षणाचे महत्व संताजी जगनाडे महाराज यांनी दिले. आज आठरा भाषेत तेरा देशांत तुकाराम महाराजाच्या गाथा आपल्यात जिवंत ठेवण्याचे काम, संत संताजी महाराजांनी केले आहे. असे प्रतिपादन सोमनाथ सुरडकर यांनी केले.
आभार रवी लुटे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या सोमनाथ लुटे, अजय यशस्वतेसाठी सुरडकर, रवी शिंदे, संतोष पवार, सदाशिव ठाकरे, ओम पाखरे, दत्ता भोलाणे, विठ्ठल शिंदे, रवींद्र सोनवणे, दीपक पाडसवान विजय सिदलंबे,आदित्य शिंदे, शंतनू सिदलंबे आदींनी परिश्रम घेतले.