शिर्डी :- शिर्डी शहरातील श्री साईबाबा समाधी मंदिर प्रवेशद्वार गेट क्र ४ येथील चौकाला श्री संत संताजी महाराज चौक असे नामकरण करून त्याचे उद्घाटन शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री सतीश दिघे साहेब, प्रथम नगराध्यक्ष श्री कैलास बापु कोते, माजी नगराध्यक्ष श्री शिवाजीराजे गोंदकर, भाजपा शहर अध्यक्ष श्री सचिन भाऊ शिंदे यांच्या उपस्थितीत फित कापून करण्यात आले.
श्री संत संताजी महाराज यांच्या चतु:शताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून ह .भ. प. प. पू. वै. लक्ष्मण महाराज वाघचौरे यांच्या प्रेरणेने साकार करण्यासाठी अॅड विक्रांत वाघचौरे व बद्रीनाथ लोखंडे यांच्या सततच्या पाठपुराव्याने व परिश्रमामुळे चौकास नामकरण करण्याचा ठराव शिर्डी नगरपरिषदेने मंजूर केला. ८ डिसेंबर श्री संत संताजी महाराज यांची शासकीय जयंती निमित्ताने शिर्डी शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, विविध पक्षांचे मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्ते हे कार्यक्रमास उपस्थित होते, श्री संत संताजी महाराज यांची ३९९ वी जयंती व चौक नामकरणाचा कार्यक्रम शिर्डी शहर तेली समाजाचे वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्यां पैकी एक असलेले , तुकाराम गाथा लेखक व रक्षक श्री संत संताजी महाराज जगनाडे संतु तेली अशी ओळख असणारे संत संताजी महाराज यांचे कार्य म्हणजे सर्व जगाला माणुसकीचे शिकवण देणारे होते , संत तुकाराम महाराज व संत संताजी महाराज हे एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत , संत तुकाराम महाराजांचे कार्य श्री संताजी महाराज यांच्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही, संताजी महाराज यांची अभंग रचना चार शतकापूर्वी आणि आताही जगाच्या कसोटीवर खरी उतरलेली असून सर्व कीर्तनात अभंगातून जनजागृती करण्याचे कार्य केले जात असल्याचे प्रतिपादन शिर्डी गावातील श्री संत संताजी महाराज चौकाच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी केले.
यावेळी नगरसेवक सुरेश आरणे,गजानन शेर्वेकर, सचिन चौघुले, संजय शिंदे, सुनील परदेशी,दत्ता कोते, सुरेश ओस्तवाल,सचिन तांबे, यशवंतराव वाघचौरे, सुरेंद्र महाले, दीपक चौधरी, गणेश वाघचौरे, शशिकांत महाले, भुपेंद्र मचाले, साईनाथ शिंदे,महेश मगर,चांगदेव कसबे,गणेश मिसाळ, राकेश भोकरे, पंडित गुढे, गणेश जाधव, अनिल चौधरी आदी समाज बांधव ,महिला, शिर्डी ग्रामस्थ व शिर्डी नगरपरिषदेचे कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.