सालाबाद प्रमाणे संताजी प्रतिष्ठाण कोथरूड या संस्थेच्या वतीने 26 जानेवारी 2016 या दिवशी महिलांसाठी हळदीकुंकू विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि तिळगुळ समारंभ गांधीभवन कोथरूड येथे मोठ्या प्रमाणात संपन्न झाला.
श्री. संताजी प्रतिष्ठाण कोथरूड हि मान्यताप्राप्त संस्था असुन संस्थेची सभासद संख्या दोन हजार पर्यंत आहे. संस्था दरवर्षी 26 जानेवारी ह्या दिवशीच हा कार्यक्रम आजपर्यंत घेत आलेली आहे. आणि या कार्यक्रमाची पुर्ण कल्पना पुणे परिसरातील सर्व समाज बंधु भगिनींना असल्यामुळे सर्वजन कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित राहतात कोणत्याही प्रकारचे पत्रक वगैरे न काढता फक्त कार्यक्रमाचे स्थळ वेळ मॅसेज द्वारे पाठवीले जाते.
श्री. संताजी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष श्री. रत्नाकरजी दळवी यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास महिला अध्यक्ष म्हणुन संताजी प्रतिष्ठाणचे सल्लागार श्री. वासुदेव गुलवाडे यांच्या पत्नी सौ. मंगलाताई वासुदेव गुलवाडे यांची निवड करण्यात आली कारण संस्थेची पुर्वीपासुनची पद्धतच अशी आहे की आपल्याच महिला कार्यकर्तीला अध्यक्ष पदाचा मान मिळाला पाहिजे. त्याच बरोबर अध्यक्ष म्हणुन संस्थेचेच अध्यक्ष श्री. रत्नाकरजी दळवी यांच्या नावाला सवार्र्ंनीच मान्यता दिली. त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणुन पुणे म.न.पा. चे विद्यमान आणि कार्यक्षम नगरसेवक मा. श्री. पृथ्वीराज सुतार नगरसेवीका सौ. आश्विनीताई जाधव, सौ. आश्विनीताई राऊत, सौ. भाग्यश्रीताई दांगट पुणे शहराचे तेली समाजाचे मा. अध्यक्ष आणि सध्याचे विश्वस्त श्री. विजयकुमार शिंदे संताजी फौन्डैशनचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. प्रकाशशेठ पवार संताजी प्रतिष्ठण नगर रोड अध्यक्ष श्री. पंडीतराव पिंगळे, अध्यक्ष श्री. रोहिदास हाडके, अप्पर सुपर इंदिरा नगरचे अध्यक्ष सचिन नगीने संताजी ब्रिेगेड पुणे शहर अध्यक्ष श्री. संतोषशेठ व्हावळ, जयभवानी टेक्नीकल इंस्टीट्युट च्या संस्थापक अध्यक्षा सौ. राधिका मखामले इत्यादी उपस्थित होते. प्रथम सर्व दिवंगत झालेल्या समाज बंधु - भगिनी साठी संस्थेच्या वतीने श्रद्धांजली वहाण्यात आली. आणि नंतर संताजी प्रतिषठाण कोथरूड या दिनदर्शीकेचे प्रकाशन करण्यात आले. सर्व मान्यवरांना प्रतिष्ठणच्या वतीने सन्मानीत केल्यानंतर मुलांना इ. 10 वी 12 वी आणि इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस आणि एक छानस गिफ्ट की ज्याचा मुलांना उपयोग होईल हे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्याच बरोबर श्री व सौ. विठ्ठलराव किर्वे यांना संताजी महाराजांची प्रतिमा देवुन सन्मानीत करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या मनोगतानंतर संस्थेचे अध्यक्ष रत्नाकरजी दळवी यांचे भाषण झाले. पाहुण्यांचे स्वागत व संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री. रमेश भोज यांनी केल तर प्रस्तावीकदिलीप शिंदे (सचिव) यांनी केले आणि आभार संस्थेचे उपाध्यक्ष अनिलजी घाटकर यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजयराव भोज, गोरख किर्वे, विजय हाडके, महेंद्र शेलार, सुरेश पिंगळे, रामचंद्र कटके, पंडीत चौधरी, लक्ष्मण कावडे, रविंद्र उबाळे, पांडुरंग क्षीरसागर, रामकृष्ण काळे, नारयण शिंदे, सुरेश शिंदे सुर्यकांत मेढेकर, वासुदेव गुलवाडे, हनुमंत वाचकवडे, सतीश उबाळे दिपक सोनवणे, सचिन देशमाने या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आणि नंतर सुरूची भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. अशा प्रकारे संताजी प्रतिष्ठाण कोथरूड येथील कार्यक्रम उत्साहत पार पडला.